Friday, November 27, 2026

Western Railway : पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक; सांताक्रूझ-माहीमदरम्यान फास्ट लोकल धीम्या मार्गावर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री, म्हणजेच 28 आणि 29 नोव्हेंबरदरम्यान सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन फास्ट मार्गावर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.  (Western Railway)

ब्लॉकचे वेळापत्रक काय?

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अप फास्ट मार्गावर रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर डाउन फास्ट मार्गावर रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

फास्ट लोकल धीम्या मार्गावरून धावणार

ब्लॉकच्या कालावधीत फास्ट मार्गावरील सर्व लोकल अंधेरी आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना संभाव्य विलंब लक्षात घ्यावा.

रविवारी दिवसा जम्बो ब्लॉक नाही

दरम्यान, रविवार, 29 नोव्हेंबर 2026 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे दिवसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या देखभाल कामामुळे अडथळा येणार नाही.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण कुमार मीणा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >