Nashik Crime : नाशिकमध्ये जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समतानगर आणि राहुल नगर परिसरात मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे. जमावाने केलेल्या मारहाणीत सनी भालेराव (वय अंदाजे ३५ ते ३६ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास राहुल नगर परिसरात ही घटना घडली. सनी भालेराव हा समतानगर येथून राहुल नगरमध्ये आला होता. परिसरात तो काही नागरिकांना विनाकारण मारहाण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याचदरम्यान त्याने जमिल शेख यांना पकडून ठेवत मारहाण करण्यास सुरुवात केली.



जमिल शेख यांना सोडवण्यासाठी नागरिकांची धाव


जमिल शेख यांना सनीच्या तावडीतून सोडवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी सनीला मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सनीला त्याच्या नातेवाईकांनी प्रथम बिटको रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



दोघे पोलीस चौकशीसाठी ताब्यात


घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी जमिल शेख आणि त्यांच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती, मारहाणीत सहभागी असलेल्या व्यक्ती आणि मृत्यूची कारणे यांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात गुन्ह्याची अधिकृत नोंद आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासानंतर घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष

Pratap Sarnaik : एलॉन मस्क यांच्या टेस्लाला दिलेल्या सवलतींचा आढावा घेणार - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

पंतप्रधान मोदींबद्दलच्या ट्वीटमुळे भावना दुखावल्या मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘प्राईम मिनिस्टर

Prithvi Shaw relationship : ‘माझी दिशाभूल झाली होती!’ साखरपुडा मोडल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; नेमकं काय घडलं?

Prithvi Shaw relationship : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Nashik : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नाशिककडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; काही एक्स्प्रेस रद्द, तर काहींचा मार्ग वळवला

Nashik : आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी कसारा येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये संतापजनक घटना, मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करण्याचा

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी