अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बाथा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. 'बाथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामे केली. आता विजय सेतुपती यांनी चाहता वर्गासाठी चित्रपटाची घोषणा केली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार असलयाचे सांगितले आहे. बाथा नंतर ट्रेन या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट थ्रिलर जॉनरचा असलयाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.(VIJAY SETUPATI)
'ट्रेन' हा चित्रपट लवकरच जवळचा चित्रपट गृहात 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे संगीत, टीझर आणि ॲक्शन दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यानचे फुटेज म्हणजेच बिहाइंड द सीन्स याआधीच चाहत्यान पर्यंत पोहचले होते. चित्रपटाचे निर्माते कलाईपुली एस. थानू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. थानू यांनी सोशीय मीडियाचा माध्यमातून लिहिले आहे की "या रोमांचक प्रवासासाठी सज्ज व्हा! ही 'ट्रेन' 4 डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखल होत आहे."
मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40 भाषांमध्ये प्रदर्शित होत असून या ...
'ट्रेन' या चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून कोणते प्रमाणपत्र मिळाले आहे?
काही महिन्यांपूर्वी, थानू यांनी जाहीर केले होते की सेन्सर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनास मंजुरी दिली असूनतेव्हा त्यांनी त्यांनी असे ही सांगितले होते की, 'ट्रेन' या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.आता 'बाथा' चित्रपटाला मिळालेलया प्रतिसादानंतर, विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेलया या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.(TRAIN MOVIE)
'ट्रेन' या चित्रपटाचे कथानक काय आहे?
अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बाधा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. 'बाथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामे केली. आता विजय सेतुपती यांनी चाहता वर्गासाठी चित्रपटाची घोषणा केली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार असलयाचे सांगितले आहे. बाथा नंतर ट्रेन या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट थ्रिलर जॉनरचा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मे महिन्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक मिस्किन यांनी या चित्रपटाच्या कथेबद्दल माहिती दिली होती. या चित्रपटाची कथा अशा एका व्यक्तीभोवती फिरते आहे ज्याने जगण्याची इच्छा गमावली आहे आणि जे आपल्या पत्नीच्या समाधीवर एक रोपटे लावण्याच्या उद्देशाने ट्रेनचा प्रवास सुरू करते. मात्र, प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यांना जीवनाचे महत्त्व कळते. या भावनिक विषयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष कारण म्हणजे दिग्दर्शकाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कथेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग उघड केला होता.
मुंबई : सनी देओल यांनी आजपर्यंत घायल, दामिनी, बॉर्डर, गदर: एक प्रेम कथा, गदर 2, बॉर्डर 2 यांसारखे सुपरहिट चित्रपट केले. याचित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी ...
'ट्रेन' चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ
विजय सेतुपती यांच्याव्यतिरिक्त, 'ट्रेन' मध्ये श्रुती हासन, नास्सर, युगी सेतु, नारायण आणि के. एस. रविकुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन मिस्किन यांनी केले असून ज्यामुळे या प्रकलपाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे.विजय सेतुपती यांनी त्यांचा अभिनयातून आणि वेगवेगळ्या भूमिकेतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांनी आजवर बॉलीवूड, तेलुगू, तमिळ अशा वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतून त्यांनी त्यांचा अभिनय चाहत्यांपर्यंत पोहचवला. "मुंबईकर, जवान, मेरी क्रिसमस, गांधी टॉकस" अशा चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. महाराजा, 96, विक्रम वेदा, मास्टर अशा अनेक चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टी गाजवली आहे. उप्पेन, मायकेल अशे सुपरहिट तेलुगू चित्रपटातून ते प्रेक्षकांचा भेटीला आले आणि आता नवीन भूमिकेत प्रेक्षकांचा भेटीला येणार आहेत. त्याची चित्रपटातील भूमिका जरी समोर आली नसली तरी प्रेक्षकांचा मनात उत्सूकता वाढली आहे.
Get ready for the ride!🚂
#Train storms into cinemas worldwide on 'DECEMBER 4'!
@mysskindirector @VijaySethuOffl @shrutihaasan @nasser_kameela @ksravikumardir @ira_dayanand @itsNarain @preethy_karan @KalaiActor @ActorRohan02 #YugiSethu @fowziafathima @editorsriwat #TapasNayak #StreetLight @vijaytelevision @RIAZtheboss @parasriazahmed1 @saregamasouth @teamimpr
— Kalaippuli S Thanu (@theVcreations) October 12, 2026