
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ प्रदर्शनापूर्वी चांगलाच चर्चेत होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. आता या चित्रपटाचे निर्माते टी. जी. विश्व प्रसाद यांनी चित्रपटाच्या अपयशाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेमका हा चित्रपट का चालला नाही? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात घोळत आहे. त्यांच्या मते, संक्रांतीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय ही मोठी चूक ठरली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ मुंबई : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातात ...
400 कोटींचे बजेट, कमाई मात्र अपेक्षेपेक्षा कमी
‘द राजा साब’ हा चित्रपट अंदाजे 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, चित्रपटाने जगभरात सुमारे 208 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. मारुती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभाससोबत संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन, रिद्धी कुमार आणि झरिना वहाब यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
हैदराबादमध्ये आपल्या आगामी ‘गरिविडी लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान टी. जी. विश्व प्रसाद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘द राजा साब’च्या अपयशाबाबत विचारले असता, त्यांनी संक्रांतीच्या काळातील प्रदर्शनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले. चित्रपट दुसऱ्या वेळी प्रदर्शित केला असता, तर त्याचा निकाल वेगळा लागला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदर्शनाच्या दिवशीही अडचणी
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी प्रीमियरला झालेला विलंब आणि तिकिटांचे दर वाढवण्याच्या प्रयत्नांमुळेही प्रेक्षक नाराज झाल्याचे निर्मात्यांनी सांगितले. त्यांच्या कंपनीसाठी हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. चित्रपटाच्या अपयशामागे अनेक कारणे असली, तरी प्रदर्शनाची वेळ हे त्यातील महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या संदर्भात प्रभासच्या चाहत्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विश्व प्रसाद यांनी आपण केवळ या चित्रपटाचे वितरक असल्याचे स्पष्ट केले. ‘द राजा साब’कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निर्मात्यांसह चाहत्यांचीही निराशा झाली.




