Wednesday, October 14, 2026

Rohit Sharma on Jasprit Bumrah : 'बुमराह क्रिकेटर नसता तर...' रोहित शर्माने दिलेलं उत्तर एकदा पहाच

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही भरती क्रिकेट टीमसाठी जणू काही आधारस्तंभ राहिले आहेत. जशी हिऱ्याची पारख जोहरीला असते तशी जसप्रीत बुमराहची पारख रोहित शर्माशिवाय चांगली कोण करू शकतं? मुंबई इंडियन्ससाठी खेळताना नेहमीच बुमराहने रोहितला चांगली साथ दिली आहे. जेव्हा रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार होता तेव्हादेखील बुमराहने आपल्या खेळातून चांगली कामगिरी दाखवत भारताला जिंकवण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. आपल्या गोलंदाजीने समोरच्या स्पर्धकांचे छक्के उडवणाऱ्या जसप्रीत बुमराह बद्दल रोहित शर्माने केलेलं विधान सध्या चांगलंच गाजतंय. जसप्रीत बुमराह जर क्रिकेटर नसता तर? या प्रश्नाचं गमतीशीर उत्तर रोहितने दिलंय.

रोहित शर्मा नक्की काय म्हणाला?

रोहित शर्माचा शो 'फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा' सध्या तुफान गाजतोय. या शोमध्ये प्रसिद्ध विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने रोहित शर्माला काही प्रश्न विचारले. यावेळी जसप्रीत बुमराह बद्दल बुमराह क्रिकेटर नसता तर कोण असता? असा प्रश्न विचारल्यावर रोहितने देखील यावर गमतीशीर आणि तितकेच विचारपूर्वक उत्तर दिले. यावेळी रोहित म्हणाले, 'जर बुमराह क्रिकेटर नसता तर तो डॉक्टर असता कारण तो शेवटी येऊन तो जेव्हा बॉल टाकतो तेव्हा भारतीय टीमला वाचवतो. म्हणजे, खूप कमी लोक असं करतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये सुद्धा अशा षटकांना 'डेथ ओव्हर्स' म्हणतात. डॉक्टरसुद्धा लोकांना मृत्यूपासून वाचवतात आणि बुमराहसुद्धा डेथ ओव्हर्समध्ये भारतीय संघाला वाचवतो.' रोहितने दिलेलं हे उत्तर अतिशय जाणीवपूर्वक आणि योग्य होते.

बुमराहच्या संघात असण्याने संघाच्या गोलंदाजीच्या योजनांचे स्वरूप बदलून जाते. पॉवरप्ले मध्ये धावगती रोखणे असो, रिवर्स स्विंगने कसोटी सामन्यांमधील भक्कम भागीदारी मोडून काढणे असो किंवा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये माफक धावसंख्येचा बचाव करणे असो, या ३१ वर्षीय गोलंदाजांची षटके संघाला अत्यंत आवश्यक आधार देतात. अखेरच्या षटकांमध्ये बुमराह गोलंदाजी करणार आहे हे समजल्यावरच अनेकांचा फज्जा उडतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >