Wednesday, October 14, 2026

IND vs WI, 4th T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, वैभव संघात आहे की नाही? श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच प्लेइंग 11 बाबत निर्णय काय आहे ते सांगून टाकलं.

भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना गमावला तर मालिका हातून जाणार आहे. दुसरीकडे, हा सामना भारताने गमावली तरी पाचव्या सामन्यात संधी असणार आहे. पण नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्याने विजयाची संधी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेता धावांचा पाठलाग करणं सोपं असतं. त्यामुळे हा सामना नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर भारताच्या बाजूने झुकला आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की, ' आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. पहिल्या डावात खेळपट्टी कशी खेळते याची आम्हाला बऱ्यापैकी कल्पना आहे. त्यामुळे, त्या आधारावर आम्ही हा निर्णय घेतला.'

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

खेळपट्टीच्या ग्राऊंड्समनच्या मूल्यांकनाबद्दल आणि अपेक्षित परिस्थितीबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला की, 'खेळपट्टी 75 टक्के लाल आणि 25 टक्के काळी आहे आणि आम्ही यापूर्वी अशा खेळपट्ट्यांवर खेळलो आहोत. पण अर्थातच, परिस्थिती पाहता आणि दव पडणार नसल्याने, सामना थोडा तीव्र होणार आहे आणि खेळपट्टीवर उसळीही मिळेल, कारण मी खेळपट्टी पाहिली आहे. ती बरीच कठीण आहे.' श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, 'हा आमच्यासाठी एक निर्णायक सामना असणार आहे आणि आम्हाला अशा मानसिकतेत राहावे लागेल जिथे आम्ही आत्मसंतुष्ट होऊ शकत नाही, कारण वेस्ट इंडिजचा संघ किती विध्वंसक आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडे नवव्या क्रमांकापर्यंत एक शक्तिशाली फलंदाजांची फळी आहे. तर हे सर्व विचार मनात ठेवून पुढे जाताना, मला वाटते की आपण खंबीर मानसिकतेत राहिले पाहिजे आणि प्रत्येक सत्रात विजय मिळवला पाहिजे.' श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला की, आम्ही तोच संघ घेऊन खेळणार आहोत. म्हणजेच वैभव सूर्यवंशीला या सामन्यात स्थान मिळालेलं नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, शामर स्प्रिंगर, गुडाकेश मोती, शामर जोसेफ. भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >