भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे भाजपच्या सुमारे 100 नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गैरहजर राहिल्याप्रकरणी या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांत आपली बाजू मांडण्याचे (स्पष्टीकरण देण्याचे) निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे पुण्यातील भाजपच्या 100 नगरसेवकांना भोवले आहे. पक्षाने या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने भाजपच्या वर्तुळात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.


पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनाही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र, शंभरहून अधिक नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. काही नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित राहून लगेच निघून गेल्याचेही समोर आले.


नगरसेवकांच्या अनुपस्थितीची बाब लक्षात आल्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून कोणते नगरसेवक उपस्थित आहेत, याची खातरजमा केली. त्यानंतर अनुपस्थित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.



पुणे महापालिकेत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले असून, सात स्वीकृत नगरसेवकांसह पक्षाचे सभागृहातील संख्याबळ 126 आहे. त्यापैकी 100 नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नगरसेवकांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित नगरसेवकांवर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

Koffee With Karan Season 9: करण जोहरच्या शोचा अखेरचा सीझन; पुन्हा रंगणार सेलिब्रिटींचा बेधडक अंदाज?

मुंबई : लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. करण जोहर होस्ट करत

JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?

मुंबई: मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे. केव्हाही शहरामध्ये प्रवास करा,

'डीपीडीसी'चा निधी यापुढे दुष्काळी उपाययोजनांसाठीच! - पाणीटंचाईवरील उपाययोजनांना प्राधान्य

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीचा (डीपीडीसी) निधी दुष्काळ

Nashik : उत्तर महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय ! स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी, मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवांचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने

Rohit Sharma on Jasprit Bumrah : 'बुमराह क्रिकेटर नसता तर...' रोहित शर्माने दिलेलं उत्तर एकदा पहाच

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही भरती क्रिकेट टीमसाठी जणू काही आधारस्तंभ राहिले आहेत. जशी हिऱ्याची पारख