Nashik Kumbha Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाशिक येथे आयोजन; पहा संपूर्ण वेळापत्रक
October 14, 2026 01:43 PM
भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र आणि अलौकिक अध्यात्मिक सोहळा मानला जाणारा 'सिंहस्थ कुंभमेळा' 2026 ते 2028 या कालावधीत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात पार पडणार आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृतकुंभातील अमृताचे थेंब पृथ्वीवरील चार पवित्र ठिकाणी सांडले होते ती ठिकाणे होती प्रयागराज , हरिद्वार (गंगा नदी), उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर. जेव्हा बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर हा भव्य दिव्य योग जुळून येतो. या काळात लाखो भाविक, साधू-संत, नागा साधू आणि अखाडे एकत्र येतात; जिथे अमृत स्नान, अखाडा मिरवणुका, गोदा आरती आणि अध्यात्मिक प्रवचनांचा अनमोल संगम पाहायला मिळतो. यंदाच्या कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाणून घेऊया.
31 ऑक्टोबर 2026 : रोजी नाशिक आणि रामकुंड येथे ध्वजारोहणाने कुंभमेळ्याचा अधिकृत प्रारंभ होणार आहे.
24 जुलै 2027 : त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा एकदा भव्य ध्वजारोहण करून मुख्य मेळ्याचे उद्घाटन.
2 ऑगस्ट 2027 : पहिले अमृत स्नान
31 ऑगस्ट 2027 : दुसरे अमृत स्नान
5 सप्टेंबर 2027 : ऋषी पंचमीचा उत्सव साजरा केला जाईल.
तिसऱ्या अमृत स्नानासाठी वैष्णव आणि शैव संप्रदायाचे वेगवेगळे मुहूर्त आहेत.
11 सप्टेंबर 2027 : रामकुंड, नाशिक येथे वैष्णव संप्रदायाचे तिसरे अमृत स्नान.
12 सप्टेंबर 2027 : कुशावर्त कुंड, त्र्यंबकेश्वर येथे शैव संप्रदायाचे तिसरे अमृत स्नान.
15 सप्टेंबर 2027 : भाद्रपद पौर्णिमा
11 ऑक्टोबर 2027 : आश्विन शुद्ध एकादशी
15 ऑक्टोबर 2027 : आश्विन पौर्णिमा.
10 नोव्हेंबर 2027 : कार्तिक शुद्ध एकादशी
17 नोव्हेंबर 2027 : कार्तिक पौर्णिमा
मुंबई विशेष प्रतिनिधी
झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मधून प्रक्रिया केलेले, ...
26 जानेवारी 2028 : मौनी अमावास्या
01 फेब्रुवारी 2028 : वसंत पंचमीचा पवित्र योग आहे.
08 फेब्रुवारी 2028 : रामकुंड, नाशिक येथे 'गंगा गोदावरी महोत्सव' साजरा केला जाईल.
27 फेब्रुवारी 2028 : त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव पार पडेल.
25 मे ते 02 जून 2028 : या कालावधीत दोन्ही ठिकाणी 'गंगा दसरा उत्सव' आयोजित केला जाईल.
24 जुलै 2028 : ध्वज उतरवून या ऐतिहासिक कुंभमेळ्याची अधिकृत सांगता होईल.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी आपल्या प्रवासाचे आणि राहण्याचे नियोजन वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः अमृत स्नानाच्या आणि प्रमुख सणांच्या दिवशी मोठी गर्दी होत असल्याने राहण्याची सोय आणि वाहनांचे बुकिंग आधीच करून ठेवावे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. तसेच दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचे आणि कुंड परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वच नागरिकांनी प्रयत्नशील असावे असे आवाहन करण्यात आले आहे.