Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १६३ ग्रॅम ६६ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संशयितांच्या चौकशीत सरकारवाडा, पंचवटी आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हेशाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्रमांक १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले होते. १३ ऑक्टोबर रोजी पोअं/आप्पा पानवळ, पोहवा/गोरख साबळे, पोअं/राम बर्डे व पोअं/मुक्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले.


माहितीची खात्री करून पथकाने सापळा रचत जावेद अब्दुल गफ्फार (वय ४०, रा. एअरसेल टॉवरच्या मागे, मोहल्ला चहाशिरीन, बी-२४, जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) व अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (वय ५६, रा. ग्राम पोस्ट सिकरी बुजुर्ग, नेहा टॉवर, तहसील धामपूर, जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सात, पंचवटीतील एक आणि मुंबईनाका हद्दीतील दोन, अशा एकूण १० ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी सरकारवाडा पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर क्रमांक १०६/२०२६ व १२३/२०२६ असे गुन्हे उघडकीस आले आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सपोनि/विश्वास चव्हाणके, जया तारडे, पोउनि/चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमिज शेख, राम शिंदे, सपोउनि/कैलास चव्हाण, योगीराज गायकर, राजेश लोखंडे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रवींद्र आढाव, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझिमखान पठाण, उत्तम पवार, मुश्रीफ शेख, गोरख साबळे, धनंजय शिंदे, पोअं/राम बर्डे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, गणेश रुमाले, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, अमोल कोष्टी, मपोहेका/शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, अनुजा येळवे, चालक/सुकराम पवार, समाधान पवार व सेवानिवृत्त दत्तात्रय कडूनोर यांनी केली.



कारवाईतील ठळक मुद्दे


२४ लाख ४३ हजार – जप्त सोन्याच्या दागिन्यांची किंमत


१६३ ग्रॅम ६६ मिलीग्रॅम – जप्त सोन्याचे वजन


१० गुन्हे – नाशिक शहरातील चोरीचे उघडकीस आलेले गुन्हे


२ संशयित – उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील आरोपी ताब्यात


७ गुन्हे – सरकारवाडा हद्दीत


१ गुन्हा – पंचवटी हद्दीत


२ गुन्हे – मुंबईनाका हद्दीत

Comments
Add Comment

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो.

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे