मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सचिन सानप यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ‘सानप शिवसेनेचा उमेदवार नाही आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबाही नाही,’ असे सांगत सामंत यांनी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी शिवसेना काम करणार असल्याचे जाहीर केले. सानप पूर्वी आपल्या मंत्रिपदाच्या काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) होते, याचा अर्थ ते शिवसेनेचे उमेदवार ठरत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागात आपण मंत्री असताना सानप ओएसडी म्हणून कार्यरत होते. त्या काळात सीएसबी शिक्षकांचा तसेच २० टक्के अनुदानाशी संबंधित शिक्षकांचा प्रश्न ते सातत्याने मांडत असत. सध्या ते पुण्यातील वाडिया महाविद्यालयाचे संचालक असून, मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाशीही ते संबंधित आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने पूर्वी मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून काम केले, याचा अर्थ ती व्यक्ती त्या पक्षाची उमेदवार ठरत नाही, असे सामंत यांनी सांगितले.
काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या शक्तीचा आणि नवचैतन्याचा जागर केला ...
सानप यांच्याशी आपण चर्चा केली असून, शिक्षकांच्या नाराजीचा मुद्दाही समोर आल्याचे सामंत म्हणाले. ‘शिक्षकांचा आमदार शिक्षक असावा’, ही त्यांची भूमिका आहे. भाजपने शिवसेनेच्या आधी उमेदवारांची यादी जाहीर केली. पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असतानाच भाजपची यादी प्रसिद्ध झाल्याने काही प्रश्न निर्माण झाले; मात्र, याचा राज्य सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. या घडामोडींविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण कल्पना दिली असून, ते योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.