Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात पोहचला असा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मधून हा मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १७ ऑक्टोबर पासून इंडियन आयडॉल रिटर्न्स सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडियन आयडॉल पासून अभिजीतच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात झाली आणि आज हा प्रवास पुन्हा एकदा त्याच्या पहिल्या प्रवासाची आठवण करून देत जुन्या आठवणींना नव्या रुपात सादर करण्यासाठी अभिजीत या शोमध्ये दिसणार आहे.

'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये त्याच्या सोबतीने प्राजक्ता शुक्रे आणि अन्य गायक मंडळीसुद्धा दिसणार असल्याचं कळतंय. नव्या प्रोमो मध्ये अभिजीतच्या पहिल्या परफॉर्मन्स पासून सुरू झालेल्या एक सुवर्ण प्रवासाची झलक पाहायला मिळते तर दुसरीकडे हिमेश रेशमियानेही अभिजीतचं कौतुक केलं आहे. संगीताच्या तालावर अभिजीतची एंट्री करत त्याने हे पुनरागमन शोला ब्लॉकबस्टर बनवेल, असं म्हटलं असून अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’प्रती असलेलं आपलं ऋण फेडलं असून, संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असंही हिमेशने सांगितलं.



अभिजीत 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' बद्दल बोलताना सांगतो, ''खरंतर या मंचावर उभं राहून गाण्यात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह आहे. ज्या मंचाने मला ओळख दिली आज पुन्हा त्याच मंचावर माझ्या जुन्या सह गायक मित्रासोबत हा अनुभव घेता येतो याचं समाधान आहे. 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये येणं हे अगदीच घरी परतून येण्यासारखं आहे असं मला वाटतं. प्रेक्षकांनी २० वर्षापूर्वी जे प्रेम दिलं होत त्याहून जास्त प्रेम ते यावेळी देतील यात शंका नाही” येणाऱ्या काळात अभिजीत अजून नवनवीन प्रोजेक्ट्सचा भाग देखील होणार असल्याचं कळतंय. तर 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' हा शो येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार