श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारताचा 24 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या पराभवाचं गणित मांडलं गेलं आहे. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही कर्णधाराचा पराभवाचा वेग इतका नव्हता. चला जाणून घेऊयात आकडेवारी

1/6 वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित लांबलं. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली आहे. असं असताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात ज्या वेगाने भारताचा पराभव होत आहे, त्या गणितात त्याने इतर भारतीय कर्णधारांना मागे सोडलं आहे. (Photo: ANI)

2/6 श्रेयस अय्यरने आतापर्यंत 20 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यात जेवढ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे, ती आकडेवारी पाहता त्याने इतर कर्णधारांना मागे टाकलं आहे. पहिल्या 20 टी20 सामन्यात सर्वाधिक सामने गमावणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: ANI)

3/6 श्रेयस अय्यरने पहिल्या 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. यासह त्याने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमची बरोबरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वात पहिल्या 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 8 सामने गमावले होते. तर विराट कोहलीच्या नेतृत्वात 7 सामने गमावले आहेत. (Photo: ANI)

4/6 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा भारतीय कर्णधार म्हणून धोनीच्या नावावर नकोसा विक्रम आहे. त्याने 70 सामन्यात नेतृत्व केलं आणि त्यापैकी 28 सामने गमावले आहेत. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने 20 पैकी 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची टक्केवारी अशीच राहिली तर आरामात धोनीला मागे टाकेल. (Photo: ANI)

5/6 टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची जागा घेतली. पण अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची मालिका पाहता आता क्रीडाप्रेमींना चिंता वाटू लागली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताला 50व्या टी20 सामन्यात आठवा पराभव सहन करावा लागला होता. (Photo: ANI)

6/6 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात घरच्या मैदानावर सामना सुरू असूनही नाजूक स्थिती आहे. आता मालिका खिशात घालण्यासाठी शेवटचा काहीही करून जिंकणं भाग आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतात खेळलेल्या 11 टी20 सामन्यात भारताने फक्त 2 सामने गमावले होते. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 4 पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या

मिनी लीलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! दिग्गज खेळाडूला सोडलं आणि वाचवले 10.35 कोटी

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सुरू होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ताज्या

शाही मार्गावर क्रिकेटचा थरार! प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणेचा बॅटमधून जलवा

लंडन : क्रिकेटची आवड आणि पर्यावरणीय संरथाचा संदेश देणारा एक अनोखा नजराणा लंडनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला.

IND vs WI, 4th T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, वैभव संघात आहे की नाही? श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिरोंशी थेट संवाद साधणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; काय होणार मोठा खुलासा?

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या खेळाडूंनी इतिहास