‘शिळ्या कढीला ऊत आणू नका!’ आमदार विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा...

MPSC प्रकरणावरून आमदार विक्रम पाचपुते यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. ‘राजकीयदृष्ट्या बेरोजगार’ असा टोला लगावत नवीन पुरावे न्यायालयीन चौकशी आणि SIT कडे सादर करण्याचे आवाहन केले. ‘अर्बन नक्षल’ वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

पुणे : “सुषमाताई अंधारे यांनी मला अभ्यासू आमदार असल्याचे मान्य केले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. मात्र, त्यांच्या वक्तव्यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे सुषमाताई या राजकीयदृष्ट्या अतिशय बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळेच त्या जुन्या विषयांना पुन्हा उजाळा देऊन शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा टोला आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी लगावला. एमपीएससीच्या विविध मुद्द्यांवर यापूर्वी सविस्तर चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून, उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर कार्यवाहीची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, याच विषयांना वारंवार नव्याने उपस्थित करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पाचपुते यांनी केली. “सुषमाताईंना माझी विनंती आहे की, त्यांच्याकडे काही नवीन पुरावे असतील तर त्यांनी ते संबंधित न्यायालयीन चौकशीसमोर सादर करावेत. पेपरफुटी प्रकरणात एसआयटीचीही स्थापना झाली आहे. एसआयटीकडे स्वतंत्र गुन्हे अन्वेषण यंत्रणा आणि तपासाची क्षमता आहे. त्यामुळे केवळ पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे देणे अधिक योग्य ठरेल,” असे पाचपुते म्हणाले.



‘अर्बन नक्षल’ संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास


सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अर्धवट व्हिडिओ दाखवल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत पाचपुते म्हणाले, “ज्याप्रमाणे तुमच्या अर्धवट वक्तव्यामुळे गैरसमज झाला, त्याचप्रमाणे माझ्याही वक्तव्याचा काही जणांनी जाणीवपूर्वक विपर्यास केला.” “माझी संपूर्ण पत्रकार परिषद आणि व्हिडिओ माझ्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहेत. मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ म्हटलेले नाही. माझा प्रश्न स्पष्ट होता की, रोहित पवार हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आडून अर्बन नक्षल तयार करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? हे प्रश्नार्थक विधान होते. विद्यार्थ्यांवर आरोप नव्हता. आजही मी माझ्या मूळ भूमिकेवर ठाम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको’


“एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यावर उपाययोजना आणि विश्वासार्ह चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, त्याच मुद्द्यांवर पुन्हा पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय राजकीय प्रसिद्धीपुरता मर्यादित ठेवू नये,” असे पाचपुते म्हणाले. शेवटी पाचपुते म्हणाले, “माझ्या शब्दांचा विपर्यास करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, सत्य कधीही लपून राहत नाही. संपूर्ण वक्तव्य समोर आल्यावर नेमकी भूमिका काय होती, हे जनतेच्या लक्षात येईल.”

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने वडिलांसोबत शेअर केले खास क्षण; कॅप्शन एकदा पहाच...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर एका नवीन पोस्टद्वारे आपले वडील सलीम खान यांच्यासोबतच्या नात्याची

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित