
भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिला सामना आणि स्मृती मंधानाला नशिबाची साथ मिळाली. नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, 'आज आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास प्राधान्य देऊ. आमची अशी दृष्टी आहे की, भविष्यात बरेच सामने रात्री आणि दवात खेळले जातील. आमचा संघ निवडताना आम्ही निश्चितपणे याचा विचार केला आहे. म्हणूनच आज आम्ही तीन वेगवान गोलंदाज, दोन मुख्य फिरकी गोलंदाज आणि सहावा पर्याय म्हणून शफालीला संधी देत आहोत.'
काय म्हणाली स्मृती मंधाना?
प्लेइंग 11 मधून कोण आत आणि कोण बाहेर? कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, दुर्दैवाने, प्रेमा रावत, जिंतिमणी , मिन्नू मणी आणि कम्मू संघातून बाहेर आहेत. अर्थात, त्या सर्व चांगल्या खेळाडू आहेत, पण आजच्या आमच्या संघरचनेनुसार, दुर्दैवाने त्या बाहेर आहेत.' कर्णधार म्हणून तुमची तयारी किती आहे आणि भारताची तयारी कशी झाली आहे? या प्रश्नावर स्मृती मंधाना म्हणाली की,'मी भारतासाठी काही वेळा आणि डब्ल्यूपीएलमध्येही नेतृत्व केले आहे. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की मी याचा खूप जास्त विचार करत आहे. मला फक्त तसxच क्रिकेट खेळायचं आहे. आणि भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, मला वाटतं की हा एक खूपच तरुण संघ आहे. अर्थात, झिम्बाब्वे एक उत्तम संघ आहे, आणि आम्ही लक्ष ठेवून असू.'
🚨 Toss 🚨
Captain Smriti Mandhana wins her first toss as #TeamIndia's full-time T20I Captain 🪙 Team India elected to bowl first. Updates ▶️ https://t.co/ZebQdoQIRo #INDvZIM | @mflone_ https://t.co/Ibd4Mc1MtQ — BCCI Women (@BCCIWomen) October 16, 2026
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप ...






