Thursday, October 15, 2026

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

स्थानिक कोळी बांधवांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे हा प्रकल्प रखडून याचा कंत्राट वाढला जाण्याची भीती प्रशासनाच्याकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत भरून काढण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मनोरी येथे होत असलेल्या या प्रकल्पातून सुरुवातील २०० दशलक्ष लीटर आणि त्यानंतर २०० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. मात्र मनोरी येथील या प्रकल्पाला कोस्टल रोड प्रकल्पा प्रमाणे स्थानिक कोळी बांधवांकडून विरोध होत आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे हा प्रकल्प रखडून याचा कंत्राट वाढला जाण्याची भीती प्रशासनाच्याकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईकरांना मनोरी येथे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी गोडे करून ते पिण्यासाठी वापरण्यासाठी २०० अधिक २०० दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी महापालिका कंत्राटदाराला रचना बांधकाम यासाठी ४०७७ कोटी रुपये आणि देखभालकरता य २०१४ कोटी रुपये अशाप्रकारे एकूण ६,०९१ कोटींचा खर्च देणार आहे. तसेच, वर्सोवा येथे येथील आणखीन २०० दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचा समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी गोडे करून ते पिण्यासाठी वापरण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. सन डिसेंबर २०३० पर्यंत मनोरी आणि वर्सोवा येथील दोन्ही प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

गारगाई धरण प्रकल्पाचे काम हाती घेतले असून सदर प्रकल्पाला आणखीन केंद्रीय स्तरावरील वन खात्याच्या दोन परवानग्या मिळणे बाकी आहेत. गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे २०२९ पर्यंत पूर्ण झाल्यावर मुंबईला त्या माध्यमातून देखील ४४० दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

मात्र स्थानिक कोळी बांधवांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे जर मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाचे काम रखडल्यास पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच, तोपर्यंत महागाई वाढून प्रकल्पाच्या खर्चात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक, मनोरी, गोराई भागातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जर नि:क्षारीकरण प्रकल्प यशस्वी झाल्यास त्या माध्यमातून मनोरी, गोराई भागातील नागरिकांना देखील पाणी मिळू शकणार आहे. त्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यास मदतच होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >