
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता यांच्यावर कांदिवली (Kandivali) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात म्हणजेच शताब्दी रुग्णालयात योग्य उपचार करण्यात आले नाही. उलट उपचार करण्याऐवजी त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन जा असे सांगून त्यांच्या उपचारांमध्ये हेळसांडपणा केला. ही गंभीर बाब हरकतीच्या मुद्द्याद्वारे भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी उपस्थित करत रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनास्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्यांद्वारे ही गंभीर बाब नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी समितीच्या निदर्शनास आणली. तिवाना यांनी सांगितले की, मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता या तरुणाचा एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला, संपूर्ण शरीराला गंभीर जखमा झाल्या. अशा गंभीर अवस्थेत या तरुणाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी शतब्दी रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या या जखमी तरुणाचे नातेवाईक १२.५० पर्यंत केस पेपर बनवण्याच्या रांगेतच थांबवले गेले. दुपारी २.०० वाजेपर्यंत त्याला आत घेतले. आणि आत घेतल्यानंतर काहीच उपचार करण्यात आले नाहीत. इंजेक्शन नाही, क्ष-किरण नाही, प्लास्टर नाही… फक्त एक वाक्य – “प्रायव्हेटमध्ये जा!”
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून स्थानिक ...
अपघात विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशु भामरे यांच्या नेतृत्वाखालील कॅज्युअल्टी विभागाने या २१ वर्षीय तरुणाला अर्धमेला अवस्थेत टाकून दिले. पूर्ण शरीराला जखमा, एक पाय पूर्ण फ्रॅक्चर… आणि तरीही सरकारी रुग्णालयाने ‘खाजगी रुग्णालयात जा’ असा निर्दयी सल्ला देऊन हात झटकले. हे आरोग्यसेवा आहे की रुग्णांची थट्टा असा असा सवाल तिवाना यांनी केला.
हीच बाब आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीचा मुद्द्येद्वारे उपस्थित केली. त्यांनी या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्षांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत चौकशीअंती निर्णय घेण्याचे सांगितले.
पण चौकशी होईपर्यंत वैभव गुप्तासारख्या शेकडो रुग्णांचे आयुष्य याच शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या बेफिकीरपणामुळे धोक्यात येत राहणार का? शतब्दी रुग्णालय हे मुंबईच्या गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी शेवटची आशा असते. तिथे जर अपघातग्रस्त तरुणालाही ‘प्रायव्हेटमध्ये जा’ असे सांगितले जात असेल, तर मग या रुग्णालयात डॉक्टर कशासाठी बसवले आहेत? असा सवाल तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला.




