Friday, October 16, 2026

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही उलथापालथी झाल्या. असं असताना या दरम्यान घडलेल्या घडामोडींबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या आयुष्यात घडत आहे. या घडामोडी घडत असताना युजवेंद्र चहल नैराश्याच्या गर्तेत अडकला होता. त्यामुळे त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. याबाबतचा खुलासा खुद्द युजवेंद्र चहलने केला आहे. घटस्फोटानंतर दारूच्या आहारी गेल्याचं त्याने सांगितलं. दारू पिण्याचं प्रमाणे मर्यादेपलीकडे गेलं होतं. यामुळे क्रिकेट कारकिर्दीला धक्का बसेल याची जाणीव झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी 26 दिवस व्यसनमुक्ती केंद्रात दाखल व्हावं लागलं होतं. आयपीएल इतिहासात 188 सामन्यांमध्ये 233 विकेट घेणारा युजवेंद्र चहल याने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या पॉडकास्टमध्ये याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.

घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...

आकाश चोप्राने पॉडकास्टमध्ये युजवेंद्र चहलची मुलाखत घेत असताना त्याला दारू सोडण्याचा निर्णय कधी घेतला? असा प्रश्न विचारला. त्यावेर युजवेंद्र चहल मनमोकळेपणाने म्हणाला की, 'गेल्या वर्षी काउंटी क्रिकेटनंतर परिस्थितीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे मी एका पुनवर्सन केंद्रात दाखल झालो आणि 26 दिवस राहिलो. आता मला ते कसे हाताळायचे आहे हे माहित आहे. त्या निर्णयामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात बराच फरक पडला. माजी परिपक्वता वाढली. माझ्या भावना आता संतुलित आहेत. गेल्या आयपीएलमध्ये जीममध्ये व्यायाम, क्षेत्ररक्षणाचा सराव आणि योग्य प्रशिक्षण घेतल्याने माझं शरीर 30 वर्षांचं झालं असं वाटत आहे.'
पॉडकास्टमध्ये आकाश चोप्राने आणखी एक गुगली टाकत युजवेंद्र चहलला विचारलं की, दारू प्यायला कशी सुरूवात झाली? तेव्हा चहल म्हणाला की, मी लहान असतानाच पार्ट्यांना जात होते. यावेळी त्याने दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने दिलेल्या सल्ल्याची आठवण काढली. एबी डिव्हिलियर्स मला म्हणाला होता की, आयुष्यात संतुलन महत्त्वाचं आहे. हे ऐकायला सोपं वाटते, पण तसं नाही. माझ्या घटस्फोटानंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. माझी मानसिक स्थिती बिघडली होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जर असंच सुरू राहिलं तर माझ्या आवडत्या क्रिकेट खेळापासून मी दुरावेल. त्यामुळे मी ते थांबवलं आणि आता खूप आनंदी आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >