घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...
आकाश चोप्राने पॉडकास्टमध्ये युजवेंद्र चहलची मुलाखत घेत असताना त्याला दारू सोडण्याचा निर्णय कधी घेतला? असा प्रश्न विचारला. त्यावेर युजवेंद्र चहल मनमोकळेपणाने म्हणाला की, 'गेल्या वर्षी काउंटी क्रिकेटनंतर परिस्थितीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे मी एका पुनवर्सन केंद्रात दाखल झालो आणि 26 दिवस राहिलो. आता मला ते कसे हाताळायचे आहे हे माहित आहे. त्या निर्णयामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात बराच फरक पडला. माजी परिपक्वता वाढली. माझ्या भावना आता संतुलित आहेत. गेल्या आयपीएलमध्ये जीममध्ये व्यायाम, क्षेत्ररक्षणाचा सराव आणि योग्य प्रशिक्षण घेतल्याने माझं शरीर 30 वर्षांचं झालं असं वाटत आहे.'
भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर हा पहिलाच सामना ...
पॉडकास्टमध्ये आकाश चोप्राने आणखी एक गुगली टाकत युजवेंद्र चहलला विचारलं की, दारू प्यायला कशी सुरूवात झाली? तेव्हा चहल म्हणाला की, मी लहान असतानाच पार्ट्यांना जात होते. यावेळी त्याने दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने दिलेल्या सल्ल्याची आठवण काढली. एबी डिव्हिलियर्स मला म्हणाला होता की, आयुष्यात संतुलन महत्त्वाचं आहे. हे ऐकायला सोपं वाटते, पण तसं नाही. माझ्या घटस्फोटानंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. माझी मानसिक स्थिती बिघडली होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जर असंच सुरू राहिलं तर माझ्या आवडत्या क्रिकेट खेळापासून मी दुरावेल. त्यामुळे मी ते थांबवलं आणि आता खूप आनंदी आहे.