
मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना घडलीये. हा वाद इतका टोकाला गेला की, वादामध्ये महिला टीसीचे कपडेच फाटले. यामुळे काही काळ स्थानक परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. हा संपूर्ण प्रकार पश्चिम रेल्वेवरील कांदिवली स्थानकावर घडला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळची आहे. कांदिवली स्थानकामध्ये, तिकीट तपासणीवेळी एका महिला टीसीमध्ये आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिला प्रवासामध्ये जोरदार वाद झाला. या वादामुळे बऱ्याच वेळ स्टेशन परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. तिकिट तपासणीस आणि प्रवाशातील वाद सोडवण्यासाठी अखेर जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांना पाचारण करावे लागले.
मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून विक्री केली जात असल्याच्या संशयावरून ...
कांदिवली रेल्वे स्थानकावर पश्चिम बाजूने शुक्रवारी (16 ऑक्टोबर) सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास महिला मुख्य तिकिट निरीक्षक आपली सेवा बजावत होत्या. त्या सेवा बजावत असताना त्यांना एक तरूणी चुकीचं तिकिट काढून प्रवास करत असल्याची आढळली. त्या तरूणीने महिला टीसीकडे दंड न आकारता सोडून देण्याची विनंती सुद्धा केली. मात्र, महिला टीसीने त्या तरूणीवर रेल्वे नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तिकडे विनातिकिट प्रवास करणारी महिला सुद्धा होती. तिने काही वेळ आधीच नियमानुसार दंड सुद्धा भरला होता. त्याच दरम्यान, त्या तरूणीने महिला टीसीच्या कारवाईतून सुटण्यासाठी रेल्वे स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा तो प्रयत्न असफल ठरला.
ठाणे: गरबा आणि रास दांडियाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने गरबाप्रेमी ...
तिला पकडण्याच्या नादात, महिला टीसी यांचा तोल जाऊन त्या रेल्वे रूळावर पडल्या. तोल गेल्यामुळे महिला टीसी रेल्वे रुळावर पडल्या. या झटापटीमध्ये, महिला टीसीचे काही प्रमाणात कपडे सुद्धा फाटले. त्यानंतर पुढच्या कारवाईसाठी त्या महिलेला तिकिट तपासणीसाठी आणण्यात आणलं. या दरम्यान, रेल्वेने त्या तरूणीसोबत असलेल्या तीन ते चार महिला प्रवाशांवर तिला हस्तक्षेप करून रेल्वे परिसरातून बाहेर नेल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर, तिकिट तपासणीच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या काही प्रवाशांनी महिला टीसीवर अयोग्य भाषा वापरल्याचा आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत जाहीर माफीची मागणी केली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, महिला टीसीने माफी मागण्यास नकार दिल्याचे म्हटलेय.
मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली ‘पीईटी-सीटी स्कॅन’ ही महागडी तपासणी ...
महिला प्रवासी आणि टीसीमध्ये झालेल्या वाद- विवादानंतर जीआरपी पोलिसांनी आणि आरपीएफ पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. त्यानंतर बहुतांश लोक घटनास्थळावरून निघून गेले. काही जण तिथेच थांबल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे रेल्वेने सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे योग्य नसले, तरी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबतच्या तक्रारींचीही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य पद्धतीने चौकशी होणे आवश्यक आहे.




