
मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून विक्री केली जात असल्याच्या संशयावरून तब्बल 48 लाख रुपये किंमतीच्या खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या एका संचालकासह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, ब्लिंकिट, झोमॅटो या एजन्सीवरही अन्न- औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उचला आहे.
ठाणे: गरबा आणि रास दांडियाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने गरबाप्रेमी ...
ठाण्यातील शांती नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकइट आणि झोमॅटो हायपरप्युअरचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, तसेच डिस्पोजल एजन्सी ऑपरेटर्स आणि स्थानिक पुरवठादार यांच्यासह 10 आरोपींची नावे आहेत. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि भारतीय दंड संहिता, 2023 च्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यात व्ही. सुब्रमण्यम, संचालक, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड- अशोक कुमार सिंग, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड- विजय भिकाजी खरमाले, नॉमिनी, रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि निलेश रामदासराव देशमुख, वेअरहाऊस मॅनेजर, रिलायन्स रिटेल लिमिटेड यांचा समावेश आहे. एफडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर दरम्यान ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (एआयएचईआर) या अभिमत ...
अधिकाऱ्यांनी मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची यादी करून तो जप्त केला, नमुने गोळा केले, जबाब नोंदवले. जप्त केलेल्या उत्पादनांची वाहतूक, विक्री किंवा नाश करण्यास मनाई करणारे निर्देश जारी केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये भिवंडीतील एका डिस्पोजल यार्डमधील 24 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल, वडपे येथील रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या गोदामातील सुमारे 4.92 लाख रुपये आणि उसाटना येथील झोमॅटो हायपरप्युअर फॅसिलिटीमधील जवळपास 7.81 लाख रुपयांच्या मालाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालाचे एकूण किंमत 48 लाख 9 हजार 924 रुपये इतकी किंमत आहे. या सर्व कंपन्यांनी उत्पादने प्रत्यक्षात नष्ट झाल्याची पुरेशी पडताळणी न करताच, ती नष्ट झाल्याचे नमूद करणारी प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे जारी केल्याचा आरोप आहे.
ठाणे: ठाण्यातील आनंद नगर- साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. ठाणे- मुंबई एन्ट्री पॉईंट समजल्या जाणाऱ्या कोपरी पुलावरून ...
अधिकाऱ्यांना विल्हेवाटीच्या नोंदींमध्येही तफावत आढळली. ज्यामध्ये मालामध्ये तफावत, माल पाठवणाऱ्याच्या आणि स्वीकारणाऱ्याच्या यादीमध्ये विसंगती असल्याचा समावेश होता. सूत्रांनुसार, भिवंडीतील परवाना नसलेल्या गोडाऊनमध्ये मालाची वर्गवारी केली जात होती, जिथे विक्रीसाठी योग्य वाटणारी पाकिटे वेगळी करून दलाल आणि स्थानिक पुरवठादारांना पुरवली जात होती. नंतर भिवंडीतील गुलजार नगर येथील एका किरकोळ विक्रीच्या दुकानात मुदत संपलेली आणि गळती होणारी उत्पादने विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. कोणताही परवाना नसताना हे दुकान चालवले जात होते.




