Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

दिवाळी आणि छट पुजेनिमित्त मुंबई ते अयोध्या कँटदरम्यान, साप्ताहिक एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. या विशेष गाडीचं कसं असेल संपूर्ण वेळापत्रक, जाणून घेऊया...

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची प्रवाशांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईहून अयोध्येकरिता विशेष एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या विशेष एक्स्प्रेसमुळे उत्तर भारतातील प्रवाशांसह महाराष्ट्रातील प्रवाशांनाही सणासुदीनिमित्त गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते अयोध्या मार्गावर 'अमृत भारत' एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून या अमृत भारत एक्स्प्रेसच्या 24 साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे.



लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक 01045 ही विशेष गाडी दर सोमवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांदरम्यान 19 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत ही एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून सकाळी 07.35 वाजता सुटेल आणि अयोध्या कँट स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.15 वाजता पोहोचेल. ह्या कालावधीमध्ये गाडीचे एकूण 12 फेऱ्या होणार आहेत. तर, गाडी क्रमांक 01046 ही साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी या दोन दिवसांदरम्यान, 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत ही एक्स्प्रेस अयोध्या कँट स्थानकावरून दुपारी 01.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर सायंकाळी 05.15 वाजता पोहोचेल. ह्या कालावधीमध्ये गाडीचे सुद्धा 12 फेऱ्या होणार आहेत.



दरम्यान, ह्या एक्स्प्रेसचा ठाणे, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुल्तानपुर या स्थानकांवर थांबा असेल. विशेष गाडीला अमृत भारत रेक जोडण्यात येणार असून त्यामध्ये आठ स्लीपर क्लास, 11 जनरल सेकंड क्लास, एक पॅन्ट्री कार आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील. सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष एक्स्प्रेसमुळे नाशिक रोड, मनमाड आणि भुसावळ इथे जाणाऱ्या नोकरदारांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील प्रवासी सुद्धा अगदी सहजरित्या प्रवास करू शकणार आहेत. या गाडीचं सीट रिझर्व्हेशन सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित तिकिटासाठी प्रवाशांना सामान्य दरांसह 'यूटीएस' प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकिटांच्या बुकिंगसाठी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात.

Comments
Add Comment

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून