Milk Prise: दूधही महागलं! सामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता; वाचा रेटकार्ड

Milk Prise Increase: जनावरांचे खाद्य, चारा आणि पशुधनाच्या वाढत्या खर्चामुळे भिवंडीमध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. वाढता खर्च पाहता नफ्यावर काहीही परिणाम होत नसल्यामुळे दुध विक्रेत्यांनी दुधाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला.

ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळाचा फटका आता केवळ शेती आणि पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सामान्य नागरिकाच्या खिशाला सुद्धा आता दुष्काळाची झळ बसू लागलेली आहे. दररोज लागणारं दूध आता महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचं बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. भिवंडीकरांना आता दुधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण, जे नागरिक स्थानिक गोठ्यांमधून दुधाची खरेदी करतात. त्यांना एका लीटरसाठी 100 रूपये मोजावे लागणार आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये दुधाचे भाव वाढले असून मिठाईसह इतरत्र पदार्थांच्याही आता किंमत वाढण्याची शक्यता आहे.



अल निनोमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पाऊसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी राजा निराश झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर चाऱ्याचे भाव वाढले आहेत. भिवंडीतील गोठ्यांमधून विकल्या जाणाऱ्या दुधाचा भाव जवळपास 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने सामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. ग्राहकांना वाढत्या महागाईमुळे एका लीटर दुधासाठी मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागत आहे. गोठा चालकांचं असं म्हणणं आहे की, जनावरांचे खाद्य, चारा आणि पशुधनासह अनेक गोष्टींचे भाव वाढले आहे, त्यामुळे आमचा नफा देखील कमी झाला आहे. ज्यामुळे दूध उत्पादन टिकवून ठेवणे अधिकाधिक कठीण होत आहे.


भिवंडीतील स्थानिक डेअरी चालकांनी आणि दूध विक्रेत्यांनी वेळोवेळी दुधाच्या किरकोळ दरात प्रति लिटर मागे ₹2 ते ₹4 ने वाढ केली आहे. या नव्या दरांमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला झळ बसणार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्य नागरिकांचं महिन्या काठी असणारं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पौष्टिक आहाराची गरज असलेल्या लोकांच्या घरी दूधाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यांना यासाठी मोठा बसण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात दुधाचा वापर आणि वाढत्या मागणीमुळे दुकानांमध्ये दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. दूध डेअरी चालकांनी एकमताने, वाढती महागाई पाहून खर्चाच्या दृष्टीनेच दुधाच्या किंमतीचे दर ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.



भिवंडी तालुका दूध उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष आनंद गाडरे यांनी 'फ्री प्रेस जर्नल'सोबत संवाद साधताना म्हणाले की, दुधाच्या किंमती वाढत आहे, हे प्रत्येक सामान्य व्यक्तीला कळतंय. परंतु जनावरांच्या देखभालीसाठी लागणार खर्च, त्यांच्यासाठी लागणारा चारा यासाठी लागणाऱ्या खर्चाकडे ते दुर्लक्ष करत आहेत. उत्पादन खर्च पाहता दुधाची किंमत वाढलेली नाही. जनावरांचे खाद्य आणि चारा महाग झाले आहेत. गेल्या 20 ते 25 दिवसांत पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी 38 ते 40 रुपये प्रति किलो दराने मिळणारी पेंड आता 50 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. पशुखाद्याचा उप- उत्पादन असलेल्या चुनीचा भाव 30 ते 32 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलोपर्यंत दर गेला आहे.


भुसा, म्हणजेच सुक्या चाऱ्याचा भाव 950 ते 960 रुपयांवरून 1370 रुपयांपर्यंत गेली आहे. भाताचा पेंढा, जो पूर्वी 7 ते 8 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता, तो आता 24 रुपये प्रति किलोवर पोहोचल्याचे वृत्त आहे. गवताचे भाव 22 ते 23 रुपयांवरून 30 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत, तर भुसा आणि पशुखाद्याच्या मिश्रणाचे भाव 38 ते 40 रुपयांवरून 50 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत. ज्वारी आणि बाजरीच्या काड्यांचा भुसा, जो पूर्वी 15 ते 16 रुपये प्रति किलो दराने मिळत होता, तो आता 20 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.



पशुधन खरेदीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर तुम्ही आज गाय खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला 1 लाखापेक्षा जास्त पैसे मोजून गाय खरेदी करावी लागते. तर पूर्वी 1 लाख ते 1.50 लाख रुपये असलेली म्हशीची किंमत आता 2 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असे गाडरे म्हणाले. शेतकऱ्यांना औषधे, पशुवैद्यकीय सेवा आणि दैनंदिन देखभालीचा खर्चही पाहावा लागतो, ज्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते.

Comments
Add Comment

Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा; पुतिन यांचा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव

वॉशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात

Surya Teaser: सनी पाजीच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'सूर्या'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

मुंबई: सनी पाजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ

थरारक घटना! तेल अवीवहून व्हिएन्ना जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; बल्गेरियामध्ये इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

सोफिया: आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांबाबत सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क असतात. प्रवाशांच्या सुरक्षेला

Hong Kong Sixes 2026: अफगाणिस्तानचे 7 खेळाडू जाहीर; पाहा संपूर्ण संघ

काबुल : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी आपल्या सात सदस्यीय संघाची घोषणा केली