मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. SIR च्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, EVM मशीनच्या घोटाळ्यावरूनही त्यांनी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर, मुख्यमंत्री पदावरूनही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दसरा मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत, जाणून घेऊया...
राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. तसेच सत्तेत असलेल्या ...
विरोधकांवर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा म्हणजे, देशातील न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. भारताच्या सर्वोच्च व्यवस्थेवर हा हल्ला आहे. एका हातात संविधान घ्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी संविधानिक संस्थेवर हल्ला करायचा? हे कोणतं संविधान धोक्यात आहे? तुम्ही संविधान वाचवायला नाही तर, संविधान तोडण्यासाठी निघालात. मोर्चा काढून तुम्ही म्हणता, सर न्यायाधीशांच्या, निवडणूक आयुक्तांच्या निवडणूका व्हायला हव्यात."
मुंबई: अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या संदर्भात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्षेप ...
"नंतर म्हणाल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींच्या, महापालिका आयुक्तांच्या निवडणूका व्हायला हव्या. अरे तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही कुठे निवडून आलात? मागच्या दाराने तुम्ही मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. मतचोरीची भाषा तुम्ही करतात, पण खरी मतचोरी 2019 ला झालीये. जेव्हा जनतेने भाजपा- शिवसेनेला मत देऊन तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्ता स्थापन केली? तीच मोठी मतचोरी होती. जिंकता तेव्हा EVM मशीन चांगली आणि जेव्हा हरता तेव्हा EVM मशीन वाईट. तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल प्रदेशमध्ये जिंकलात तेव्हा काय झालं? तेव्हा मतचोरी नव्हती का? "
मुंबई : हिवाळी अधिवेशन जवळ येत असताना राज्याच्या अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
"विरोधक म्हणतात आता बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, तुम्ही तर बुथ कॅप्चरिंग करून निवडणूका जिंकायचे. तेव्हा मतचोरी नव्हती का? ते काय होतं? SIR यादी साफ करा, त्या होतायत आता, मतदार यादी सुद्धा साफ होतायत. जर तुमचं नाव त्यातून वगळलं तर, तुम्हाला पुन्हा नाव सामील करता येईल. " विरोधकांच्या दुटप्पीपणा भूमिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. रोज रोज नवनवीन नौटंकी करत तुम्ही राजकारण करताय? असं म्हणत टीकेचे बाण सोडले आहेत.