Nashik Crime: चांदवडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 95 हजारांचा गांजा जप्त, दोन आरोपी जेरबंद

Nashik Chinchwad Ganja Seized: नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक: नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चांदवड पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अन्न- औषध प्रशासनाकडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली जात आहे. असं असताना आता स्थानिक गुन्हे शाखेकडूनही अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.



सोमवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वागदर्डी शिवारातील वागदर्डी शिंगवे रस्त्यावर धरणाजवळ दोन जणं अवैधरित्या गांजा विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती चांदवड पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे, दोन पंच समक्ष खात्री करून संशयीत आरोपी आनंद पांडुरंग परदेशी वय 47 वर्ष रा. संभाजीनगर मनमाड तालुका नांदगाव आणि संजय काशिनाथ शिंदे व 57 वर्ष रा. रापली तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांना काल सायंकाळी 05.20 वाजता जागीच पकडून त्यांची दोन पंचासमक्ष अंग झडती घेतली.



घेतलेल्या झडतीमध्ये, दोन्ही आरोपींकडून ताब्यात 4 किलो 351 ग्रॅम गांजा (95,722 रु), सुझुकी बर्गमॅन मोटार सायकल क्रमांक MH 41 BW 8808 आणि बजाज कंपनीची प्लॅटिना मोटर सायकल क्रमांक MH 41 BZ 9488 असा मुद्देमाल जप्त केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये, पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी जप्ती पंचनामा करून आनंद परदेशी आणि संजय शिंदे या दोन्हीही आरोपींविरोधात, पोलीस निरीक्षक दत्ता निराबा कांभिरे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चांदवड पोलीस ठाणे येथे अमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.



सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, सहा पोलीस निरीक्षक अमोल मोरे व स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, संदीप महाजन, योगेश कोळी तसेच चांदवड पोलीस ठाणेचे सहा पोलीस उप निरीक्षक भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार अमोल जाधव,चेतन बागल, दिनेश सुळ, राजू गायकवाड, स्वप्निल रंधे, प्रदिप आजगे, योगेश हटकर, विक्रम बस्ते यांच्या पथकाने सयुक्त कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

Pankaja Munde : भगवानगडावर पंकजा मुंडेंचा हुंकार ! शेरोशायरीतून जातीय भेदभावावर प्रहार ; दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाल्या ?

 बीड : “जय भगवान, छत्रपती शिवाजी महाराज की जय,” अशा जयघोषाने मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही’; दुष्काळग्रस्तांसाठी ठाण्यातून मदतीचे शेकडो ट्रक रवाना ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत साहित्याला दाखवला भगवा झेंडा

ठाणे : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या माध्यमातून

RSS Vijayadashami 2026: सामाजिक एकता, व्यसनमुक्ती ते AI पर्यंत, मोहन भागवत दसरा मेळाव्यात काय काय म्हणाले ?

RSS Vijayadashami Utsav 2026 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव आणि

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, 182 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

मुंबई: सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदानाची जोरदार चर्चा सुरू आहे. या

Shiv Sena Dasara Melava 2026: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार?

मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त