
आजकालच्या जगात माणसाला वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रात 10.9 लाख लोकांना हाय शुगरचा (डायबीटीज) त्रास. धावपळीच्या जीवनात अनेकजण जेवण झालयानंतर लगेच झोपतात किंवा आराम करतात. मात्र, जेवणानंतर काही मिनिटं हलक्या गतीने चालण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणानंतर चालणं उपयुक्त ठरू शकते. मग जेवणानंतर किती वेळ चालावं आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? जाणून घेऊया...
जेवल्यानंतर किती वेळ चालणे गरजेचे असते?
जेवणानंतर चालल्याने शरीराला खूप फायदा होतो. कारण जेवल्यानंतर शरीरातील शुगर लेव्हल वाढते, ज्याला तुम्ही चालून कंट्रोलमध्ये आणू शकता. जेवणानंतर 15 ते 20 मिनिटांनी चालणे फायद्याचे असते. याच्यासाठी खूप वेगाने चालण्याची किंवा एक्सरसाईज करण्याची गरज नाही. आरामात चालल्याने देखील फायदा होतो. खरतर जेवल्यानंतर शरीरात ब्लड शुगरची पातळी वाढलेली असते. या दरम्यान चालण्याने शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.(HEALTHY LIFESTYLE)
दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे फायदेशीर ठरते. यासाठी हायड्राफेशिअल, केमिकल ...
वेगाने चालणे आणि हेव्ही वर्कआऊट करणे का टाळले पाहिजे?
जेवल्यानंतर अचानक खूप वेगाने चालणे किंवा हेव्ही वर्कआऊट करणे योग्य नाही. जर चालताना छातीत वेदना होता असतील किंवा चक्कर, असामान्यपणे दम लागणे अशा समस्या होत असतील तर थांबा आणि गरज लागण्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे असते. जर तुम्ही हार्टचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला खूप आधीपासूनच गंभीर आजार असतील तर वॉक आणि एक्सरसाईजच्या योग्य पद्धती आणि वेळ जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.(LIFESTYLE TIPS)
[caption id="attachment_1067602" align="alignnone" width="850"] कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या भाज्या घरी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरलया जातात. पण अनेकदा, बाजारातून ताज्या भाज्या ...
रोज 30 ते 35 मिनिटांचा वॉक का करावा?
रोज 30 ते 35 मिनिटे चालणं खूप गरजेचे असते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते, वजन कमी होण्यास मदत होते, हृदयविकाराचे आजार कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमित झोप आणि चांगला आहार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. तुमचा डॉक्टरांकडून वेळच्यावेळी सल्ला घेणेही तितकेच गरजेचे असते.
(टीप: प्रस्तुत लेखात दिलेली माहिती ही वाचकांच्या ज्ञानवर्धनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. यातील कोणत्याही दाव्यांची अथवा तथ्यांची पुष्टी 'प्रहार' करत नाही.)





