Wednesday, October 21, 2026

Nashik: नाशिकच्या 'या' भागात उद्या वीजपुरवठा बंद

नाशिक शहरातील महावितरणच्या पाथर्डी विद्युत उपकेंद्रात तातडीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरूवार दिनांक २२ आक्टोंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपकेंद्रातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार आहे.

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील. यामध्ये गौळाणे रोड परिसर, पाथर्डी गाव, आर. के लॉन्स परिसर, पाथर्डी फाटा परिसर, ज्ञानेश्वर नगर, एकता कॉलनी परिसर, दामोदर चौक, नरहरी नगर, आनंद नगर पोलीस चौकी परिसर आणि एकता कॉलनी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग क्र. २ कडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >