वाघ शिकार करणं सोडत नाही...! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझी कंबर कसून काम करत आहेत. यात दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी आघाडीवर आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने सौरव गांगुलीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर बॅटिंग कोच म्हणून युवराज सिंगला निवडलं आणि आता...

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्सनंतर दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी कमनशिबी आहे. एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. आतापर्यंत संघात दिग्गज खेळाडू खेळून गेले. पण यश काही मिळालं नाही. पण आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने फासे टाकले आहेत. आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली यांची नियुक्ती केली आहे. तर फलंदाज प्रशिक्षकांची जबाबदारी युवराज सिंगच्या खांद्यावर टाकली आहे. आता गोलंदाज प्रशिक्षकाची निवड करत क्रीडाप्रेमींना धक्का दिला आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा याची फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएल स्पर्धेत आपल्या फिरकी आणि गुगलीच्या जोरावर फलंदाजांना चकवणारा अमित मिश्रा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.



दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला व्हिडीओ


दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्रा प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमित मिश्रा आणि दिल्लीचं नातं या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं आहे. अमित मिश्रा यांनी सांगितलं की, खेळाडू म्हणून अमित मिश्रा पहिल्या पर्वात दिल्लीकडून खेळला होता. आता प्रशिक्षक म्हणून या संघासोबत असणार आहे. या व्हिडीओ अमित मिश्रा म्हणाला की, 'टाइगर कभी अपने शिकार को छोड़ता नहीं है और दिल्ली उनकी धड़कन है.'अमित मिश्रा 2008 पासून 2024 पर्यंत आयपीएल खेळला होता. तर 2003 मध्ये सौरव गांगुली कर्णधार असताना भारतीय संघात पदार्पण केलं होतं. आता सौरव गांगुलीच्या मुख्य प्रशिक्षणात अमित मिश्राही फिरकी गोलंदाजीचे धडे शिकवणार आहे.






अमित मिश्रा याची आयपीएल कारकिर्द


अमित मिश्रा आयपीएल स्पर्धेत एकूण 162 सामने खेळला असून 174 विकेट काढल्या आहे. आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. तेव्हा त्याने 20 धावा देत एक विकेट काढली होती. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सकडून डेक्कन चार्जर्सविरुद्ध, त्यानंतर 2011 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळाला, 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी पुणे वॉरियर्सविरुद्ध हॅटट्रीक घेतली आहे. अमित मिश्राने भारतासाठी 22 कसोटी, 36 वनजे आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात एकूण 156 विकेट काढल्या आहेत.

Comments
Add Comment

Ranji Trophy Elite 2026-27: मुंबईची हिमाचल प्रदेशवर सरशी, सरफराज खान ठरला विजयाचा हिरो

रणजी ट्रॉफी 2026-27 स्पर्धेचं पर्व सुरू आहे. या स्पर्धेत मुंबई आणि हिमाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या

U19 Women's T20 World Cup 2027 : 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2027 चा महासंग्राम जाहीर, जाणून घ्या भारताचे वेळापत्रक

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी 19

Asian Para Games 2026: भारताची पदकांची लय कायम! खेळाडूंनी गाजवलं मैदान; जाणून घ्या गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ जिंकणाऱ्या भारतीयांची नावे

नागोया (जपान) : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी

एशियन पॅरा गेम्स 2026 स्पर्धेचा चौथा दिवस भारतीय स्पर्धकांनी गाजवला, कोणी जिंकली पदकं? जाणून घ्या

एशियन पॅरा गेम्स 2026 स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली आहे. पहिल्या दोन दिवसातच भारताने आपली चमक दाखवून दिली.

IND vs NZ: टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही पहिल्या सामन्यात धाकधूक! असं का?

वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज

INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला दिला क्लिन स्विप, तिसऱ्या टी20 सामन्यात 92 धावांनी नमवलं

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं. स्मृती मंधानाने नेतृत्व हाती