
एशियन पॅरा गेम्स 2026 स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली आहे. पहिल्या दोन दिवसातच भारताने आपली चमक दाखवून दिली. चौथ्या दिवसापर्यंत भारताने पदकतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली आहे. भारताने चौथ्या दिवसापर्यंत 58 पदकांची कमाई केली आहे. यात 14 सुवर्ण, 21 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. चौथ्या दिवशी भारताने 23 पदकं जिंकली, त्यामुळे पदक संक्या 35 वरून थेट 58 वर गेली. यात भारताने 14 सुवर्ण, 21 रौप्य आणि 23 कांस्य पदक पटकावली. महिलांच्या 100 टी12, पुरूषांच्या 100 मीटर टी47, पुरूषांच्या गोळाफेक शॉटपुट एफ 46, पुरूषांच्या गोळाफेक शॉटपुट एफ53 आणि पुरूषांच्या उंची उडी टी44/64 प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावलं.
चौथ्या दिवशी सुवर्ण पदकाचे मानकरी
भारतीय धावपटू सिमरनने बुधवारी महिलांच्या 100 मीटर टी12 शर्यत 12.02 सेकंदा पूर्ण केली. यासह एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवून आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले. सिमरनने मंगळवारी 200 मीटर शर्यतीतही विक्रम नोंदवला होता.बुधवारी सिमरनने पुन्हा एकदा इराणच्या हझार सफारझादेहवर मात केली.टी12 या गटात सौम्य ते तीव्र दृष्टीदोष असलेल्या खेळाडूंचा समावेश असतो.
आयुष वर्मा यांनी दोन दिवसात दोन पदकं मिळवली. पुरूषांच्या एफ 53 प्रकारात गोळाफेक शॉटपुट प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावलं. आयुषची 8.16 मीटरची सर्वोत्तम फेक सुवर्णपदक जिंकण्यासाठी पुरेशी ठरली. इराणच्या अलीरेझा हमामीने 8.09 मीटरच्या फेकीसह रौप्यपदक पटकावले.
वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ...
पुरुषांच्या शॉटपुट F53 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनुभवी भारतीय पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमारने उंच उडीमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. मागील एशियन गेम्स पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता प्रवीणने पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान भारताच्याच बंटीने याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
एफ 46 प्रकारात भारतीय स्टार सचिन सुरुवातीपासूनच विजयाचा प्रबळ दावेदार होता. त्याने मागील पॅरालिम्पिक्समध्येही याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला होता आणि त्यात तो यशस्वीही झाला.
भारतीय धावपटू दिलीप गवीतने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स पॅरा गेम्समध्ये इतिहास रचला आहे. त्याने बुधवारी आशियाई पॅरा गेम्समधील पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात सुवर्णपदक जिंकले.





