रविवारी रात्री अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. त्यात सात गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारातून अभिनेता थोडक्यात बचावला परंतु टायगरवर गोळीबार करणारे हल्लेखोर हे महिनाभरापूर्वी मुंबईत आले असल्याची माहिती आहे. ते एक महिना मोठ्या कलाकारांच्या घरांची पाहणी करत होते. त्यांनी एक ऑटोरिक्षा भाड्यानं घेतल्याचीही माहिती आहे. त्यातून मुंबईचा दौरा केला. पाहणी करण्यासाठी ते बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा गेले होते. ऑटोरिक्षा चालकाने यांना अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासह विविध सेलिब्रिटींच्या घरी नेल्याचेही कळाले. आता, टायगरवरील हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे.(AMITABH BACHCHAN)
बिग बॉस 20 सध्या खूप गोष्टींमुळे चर्चेत असतो. मग ते तगडी भांडणं आणि वाद, माही विजची 'बॉसगिरी', कनिका विरुद्ध यंग डीएसए, पर्सनल लाईफचे खुलासे या सगळ्या मुळे ...
बिग-बी हे नेहमीच खूप चर्चेत असतात. सोशियल मीडिया वरही खूप ऍक्टिव्ह असतात. चाहते त्यांचा वेगवेगळ्या कामांमुळे त्यांच्यावर भरभरून प्रेम करत असतात. अमिताभ बच्चन यांनी केलेल्या पोस्टनुसार त्यांनी असे लिहिले आहे की, ‘मी माफी मागतो. मला विश्रांती घेण्यासाठी आणि ताजेतवाने होऊन पुन्हा मंचावर दमदार एन्ट्री करायची आहे त्यासाठी काही दिवस आराम करायला सांगितला आहे. त्यामुळे मी आता काहीही लिहू शकत नाही.’ यामुळे चाहत्यांमध्ये बिग-बींबद्दल काळजी वाटतं आहे.अमिताभ बच्चन यांना पुन्हा बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत त्यांची आतुरतेने वाट बघत आहेत.
T 5889,10,11,12 - apologies .. क्षमा प्रार्थी हूँ, कुछ दिनों के लिए आराम और सँवरने का समय निकालने को कहा गया है सो कुछ लिख नहीं पा रहा हूँ ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 21, 2026
बिग- बींच्या भूमिका
अमिताभ बच्चन आत्ताच 'वेट्टैयन' या चित्रपटातून प्रेक्षांचा भेटीला आले होते. त्यानंतर ‘द रिअल सुपरस्टार’ यात सुद्धा दिसले होते. २०२५ मध्ये बिग-बींनी ‘१२० बहादूर’ या सिनेमासाठी व्हॉईसओव्हर दिला होता. अमिताभ बच्चन आता नवीन भूमिकेत दिसणार आहेत. ‘कल्की २८९८ एडी: पार्ट २’ या चित्रपटातून समोर येणार आहेत. यात ते खूप महत्वाची भूमिका बजावणार असून अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाच्या पहिल्या भागातही काम केलं आहे. लवकरात लवकर अमिताभ बच्चन यांना पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.