important and practical life: ताटात लोणचं असेल तर जेवणाची चव दुप्पट! पण फायदे काय?

आंबा लिंबूचं लोणचं किंवा आंबे हळदीचं ड्राय खल्लंय का कधी? जाणून घ्या आंबे हळदीचे फायदे आणि सोपी रेसिपी

1/6 जेवणाची रंगत वाढावी म्हणून अनेकदा ताटात डाव्या बाजूला लोणचं, चटणी असं चटपटीत काहीतरी वाढलेले असते. आहार चांगला असावा यासाठी हे सगळे आवश्यक असते, पण जेवणाची रंगत वाढावी यासाठीही लोणचं आणि चटण्या आवर्जून केल्या जातात. इतकेच नाही तर हे पदार्थ आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतात.

 

2/6 आंबा लिंबूच लोणचं का आहे फायदेशीर
आंबा लिंबूचे लोणचे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण यामध्ये आंबा आणि लिंबू या दोन्ही फळांचे पौष्टिक गुणधर्म एकत्र मिळतात. हे लोणचे शरीराची पचनशक्ती सुधारतात, कारण आंबट चवीमुळे पाचक रसांची निर्मिती होते आणि अपचन किंवा गॅसचा त्रास कमी होतो. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन (सी) असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्वचा तसेच केसांचे आरोग्य सुधारते. लिंबू आणि आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील घातक घटक बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच, या लोणच्यामध्ये वापरले जाणारे मेथी, मोहरी, हिंग आणि हळद यांसारखे मसाले जंतूनाशक आणि दाहक-विरोधी म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीरातल्या आजारांपासून संरक्षण मिळते. मर्यादित प्रमाणात हे खल्ले तर अन्नाची चव वाढण्यासोबतच आरोग्यालाही उत्तम लाभ मिळतात.

 

3/6 जाणून घ्या लोणचं बनवण्याची सोप्पी पद्धत
1. तयारी करा: कैरी आणि लिंबू स्वच्छ धुवून, कापडाने पूर्णपणे कोरडे करून घ्या. त्यामध्ये पाण्याचा थेंबही राहू नये. नंतर त्यांचे बारीक तुकडे करा. लिंबाच्या बिया काढून टाका जेणेकरून लोणचे कडू होणार नाही.
2. मीठ-हळद लावा: एका मोठ्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात कैरी आणि लिंबाचे तुकडे काढा. त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
3. मसाले टाका: आता त्यात लाल तिखट आणि मोहरीची डाळ घालून एकत्र करा.
4. फोडणी द्या: एका छोट्या कढईत तेल चांगले कडकडीत गरम करा. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करा. तेल थोडे कोमट झाले की त्यात हिंग टाका.
5. एकत्र करा: ही कोमट झालेली फोडणी कैरी-लिंबाच्या मिश्रणावर ओता आणि चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.
तुमचे चमचमीत आंबा-लिंबाचे तयार आता हे लोणचे एका स्वच्छ, सुक्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. 2 ते 3 दिवसांत लिंबू आणि कैरी छान मुरते आणि लोणच्याला अप्रतिम चव येते.

 

4/6 आंबे हळदीचे फायदे
ओल्या हळदीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यातील गुणधर्म कर्करोगाशी लढण्याचे काम करतात. आंबे हळद ही आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून तिच्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी दुधात आंबे हळद टाकून पिणे खूप फायदेशीर ठरते. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी, पिंपल्स, काळे डाग दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आंबे हळदीचा लेप लावला जातो. याशिवाय, शरीराला कुठेही मुका मार लागल्यास, सूज आलयास किंवा सांधेदुखीचा त्रास असल्यास आंबे हळद आणि चुना एकत्र करून लावलयाने वेदना कमी होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रक्ताभिसरण गतिमान करून शरीर डिटॉक्स (विषारी घटक बाहेर टाकणे) करण्यासाठी सुद्धा आंबे हळदीचे नियमित सेवन करणे अत्यंत गुणकारी मानले जाते.

 

5/6 अबामे हळदीचं ड्राय कास करायच जाणून घेऊया
आंबे हळदीचे कंद स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावीत. त्यावरील साल काढून टाकावी. त्यानंतर कंद किसावे किंवा त्याचे चिप्स करावे. काप केलेलया हळदीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, चवीनुसार मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद पावडर मिक्स करून हवाबंद डब्यात ठेवून द्यावी. दुसऱ्या दिवशी त्यावर चमचाभर लिंबाचा रस किंवा एक लिंबाची फोड ठेवावी. तिसऱ्या दिवशी उकळलेले तेल घालून फोडणी द्यावी. एक-दोन दिवसानंतर लोणचे खाण्यायोग्य मुरले जाते.

 

6/6 उन्हाळ्याच्या दिवसांत आपण ज्याप्रमाणे कैरी, मिरच्या आणि लिंबाचे लोणचे करतो. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये आवळा, ओली हळद आणि आंबेहळदीचे लोणचे आवर्जून केले जाते. पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे लोणचे झटपट होते आणि आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते.
Comments
Add Comment

Vegetable storage tips in fridge: तुमचा भाज्या फ्रिजमध्ये ठेऊन सुद्धा खराब होतायत का? जाणून घ्या टिप्स

[caption id="attachment_1067602" align="alignnone" width="850"] कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या भाज्या घरी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरलया जातात. पण

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण