लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी लग्नाचा विचार करण्याऐवजी कोणताही विचार न करता भविष्य सुरक्षित करायच्या दृष्टीने तुम्ही विचार करा.

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि लग्नाचं संपूर्ण प्लॅनिंग कसं व्हायला हवं यांसारख्या सर्व गोष्टी आपण ठरवतो. पण एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आपण केव्हा घेत नाही, तो म्हणजे टर्म इन्शुरन्स (Term Insurance). अनेकांना प्रश्न पडतो की, टर्म इन्शुरन्स लग्नाआधी घ्यावा की लग्नानंतर? याचे सोपे उत्तर आहे, जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर लग्नाचा विचार करूच नका. कदाचित लग्नाच्या आधीच टर्म इन्शुरन्स घ्या.


खरं तर, टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम तुमच्या वयावर आणि आरोग्य स्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. कमी वयात पॉलिसी घेतल्यास प्रीमियम सहसा कमी लागतो आणि पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीसाठी दर निश्चित केला जातो. याचा अर्थ असा की, तुम्ही जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स घ्याल, तितके तुमचे प्रीमियम कमी असतील आणि तुम्हाला त्याचा लाभ अधिक मिळेल. अनेक लोक आयुष्यात एखादी मोठी घटना घडल्यानंतरच इन्श्योरन्सला गांभीर्याने घेतात. अनेक लोकं विमा काढण्याचा विचार करतात, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते विमा काढण्याचा विचार पुढे ढकलतात. जेव्हा आयुष्यामध्ये कठीण काळ येतो, तेव्हा त्यांना विम्याचे महत्त्व कळते. त्यामुळे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला भविष्यात संरक्षण देतो, म्हणून त्यात विलंब न करणे महत्त्वाचे आहे.



टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचे योग्य वय?


टर्म इन्शुरन्स खरेदी करताना तुमचे वय जितके कमी असेल, तितके ते अधिक चांगले. काही लोक लहान वयात लग्न करतात, तर काही जण वय जास्त झाल्यानंतर लग्न करतात. त्यामुळे, टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा निर्णय तुम्ही विवाहित आहात की नाही यापेक्षा तुमच्या वयावर अधिक अवलंबून आहे. साधारणपणे, टर्म इन्शुरन्स 25 ते 30 वयोगटात खरेदी केला पाहिजे. टर्म इन्शुरन्स खरेदी करताना तुमचे वय जितके कमी असेल, तितका तुमचा प्रीमियम कमी असेल. टर्म इन्शुरन्सचा फायदा हा आहे की एकदा प्रीमियम निश्चित झाल्यावर, तो आयुष्यभर तसाच राहतो, तो बदलत नाही. जर तुमचे कोणतेही उत्पन्न नसेल, तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळू शकणार नाही, कारण विमा कंपन्यांना उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असतो.



टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?


टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते किंवा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करता. म्हणजेच, जर तुम्हाला वयाच्या 22 व्या वर्षी नोकरी मिळाली असेल किंवा वयाच्या 20 किंवा 21 व्या वर्षी पैसे कमवायला सुरुवात केली असेल, तर त्याचदरम्यान तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी केला पाहिजे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याची एवढी घाई का? तो तर सहजच खरेदी करता येतो. जर तुम्हाला असे वाटत असेल, तर तुम्ही 25 ते 35 वर्षे वयोगट दरम्यानचे प्रीमियम पाहिले पाहिजेत. तसेच, लवकर टर्म इन्शुरन्स खरेदी करणारी व्यक्ती दोन्ही परिस्थितीत किती पैसे वाचवेल याचाही विचार करा. 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या उदाहरणाद्वारे संपूर्ण Calculation समजून घेऊया.



जर एखादी व्यक्ती वयाच्या 25 व्या वर्षी पॉलिसी काढते आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण कायम ठेवते, पॉलिसीची मुदत 30 वर्षे असेल. साधारणपणे, वयाच्या 25 व्या वर्षी टर्म इन्शुरन्स घेतल्यास वार्षिक प्रीमियम अंदाजे 8,034 असतो. याचा अर्थ असा की, ३० वर्षांमध्ये तुम्हाला एकूण 8034 × 30= 2,41,020 इतका प्रिमियम तुम्हाला भरावा लागेल. आता, एका व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचा टर्म प्लॅन घेतला. पॉलिसीचे संरक्षण वयाच्या 60 वर्षांपर्यंत आवश्यक आहे, त्यामुळे पॉलिसीची मुदत आता 25 वर्षे होईल. वयाच्या 35 व्या वर्षी, त्याच टर्म इन्शुरन्ससाठी वार्षिक प्रिमियम अंदाजे 14,440 रुपये असेल. म्हणून, 25 वर्षांमध्ये, तुम्हाला एकूण 14,440 रुपये × 25 = 3,61,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल.


35 वर्षांतील एकूण हप्ता 3,61,000 - 25 वर्षांतील एकूण हप्ता 2,41,020= 1,19,980 याचा अर्थ असा की, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी टर्म इन्शुरन्स खरेदी केला तर तुमचे अंदाजे 1.20 लाख वाचतील. याव्यतिरिक्त, त्यांना अतिरिक्त 10 वर्षांचे संरक्षण मिळते, म्हणजेच वयाच्या 25 वर्षांनंतरही त्यांना संरक्षण मिळते. या Calculation नुसार, केवळ 1.20 लाखांच्या Saving वर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. याचा खरा फायदा हा आहे की, कमी वयात पॉलिसी खरेदी केल्याने व्यक्तींना त्यांचे प्रीमियम दर निश्चित करता येतात. टर्म इन्शुरन्समध्ये, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून, प्रीमियम सामान्यतः पॉलिसी सुरू करतानाच निश्चित ठेवला जातो.

Comments
Add Comment

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा; देवी चरणी साकडे घालत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचे यंदा

कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये! अन्न व चाऱ्याच्या नियोजनावर मुख्यमंत्र्यांचा भर

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना

Kerala business class bus : विमानासारख्या लक्झरी सुविधा आता बसमध्ये! केरळ सरकारच्या 'बिझनेस क्लास' बस प्रवासाची सर्वत्र चर्चा

विमान प्रवासात मिळणाऱ्या एअर होस्टेस, हाय-स्पीड वाय-फाय, मनोरंजनासाठी वैयक्तिक स्क्रीन आणि बसच्या आतच वॉशरूम