Nashik : ओझर-पिंपळगाव महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, अनेक प्रवासी जखमी

भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांना धडक दिली आणि त्यानंतर थेट दुभाजकावर जाऊन आदळली.

Nashik : ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर आज दुपारी शिरपूर-नाशिक एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांना धडक दिली आणि त्यानंतर थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.



चालकाचे नियंत्रण सुटले अन्...


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरपूरहून नाशिकच्या दिशेने जाणारी एसटी बस ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावरून जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांना धडक दिली आणि थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.



जखमींना रुग्णालयात हलवले


अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मदतकार्य जलदगतीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.



महामार्गावर वाहतूक कोंडी


या अपघातामुळे ओझर-पिंपळगाव महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील प्रचारतोफा उद्या थंडावणार, २३ ऑक्टोबरला मतदान; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीच्या

KSBKBT2 off air: 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक

‘क्योंकि सास भी कभी बही थी २’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्मृती इराणी यांनी या मालिकेतून छोट्या

IND vs NZ: टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही पहिल्या सामन्यात धाकधूक! असं का?

वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज

पत्नीविरोधात आरोप, 13 मिनिटांचा VIDEO अन् कोकणकड्यावरून उडी; गुजरातच्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ

गुजरातमधील 24 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील 1700 फूट उंच कोकणकड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गेल्या

Nashik Crime : नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार ! दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी देत 71 लाखांची फसवणूक

Nashik Crime : काश्मीरमधील दहशतवादी प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत अटक आणि मालमत्ता जप्तीची भीती दाखवून सायबर

'जेलर 2' मध्ये मोहनलालचा बॉडी डबल वापरल्याचे सत्य समोर; अखेर तो कलाकार आला समोर!

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर 2' चित्रपट रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.