मुंबईचा डाव
पहिल्या डावात मुंबईची सुरूवात काही खास झाली नाही. दिव्यांश सक्सेना 9 आणि अंगकृष रघुवंशी 20 धावा करून बाद झाले. त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार सिद्धेश लाड यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. मुशीर खान 57 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर सरफराज खानचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने सिद्धेश लाडसोबत 68 धावांची भागीदारी केली. सिद्धेश लाड 87 धावांवर असताना बाद झाला. असं असताना सरफराज खानला आकाश आनंद याची साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. सरफराज खान 154 धावा करून बाद झाला. तर आकाश आनंद 117 धावांवर नाबाद राहिला. तनुष कोटियान 15 आणि तुषार देशपांडे 26 धावा करून बाद झाले.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्सनंतर दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी कमनशिबी आहे. एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. आतापर्यंत संघात दिग्गज ...
सरफराज खान विजयाचा शिल्पकार
मुंबईकडून पहिल्या डावात तुषार देशपांडेने भेदक गोलंदाजी केली. त्याने 13.5 षटकात 46 धावा देत 4 विकेट काढल्या. तर मोहित अवस्थी 1, सिल्व्हेस्टर डिसोजाने 2 आणि तनुष कोटियनने 1 विकेट काढली. दुसऱ्या डावात मोहित अवस्थीने 5, तुषार देशपांडेने 2, शम्स मुलानीने 2 आणि सिल्व्हेस्टर डिसोजाने 1 विकेट काढली. एकंदरीत या सामन्यात सरफराज खानची खेळी महत्त्वाची ठरली. त्यामुळे या विजयाचा हिरो म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला.