चंदीगड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील ५६ वर्षीय व्यावसायिक दीपक मित्तल हे बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी सेक्टर १७ मधील एका पंचतारांकित हॉटेलमधील त्यांच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने GMSH-१६ रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मित्तल हे मंगळवारी संध्याकाळी हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांची खोली दोन व्यक्तींसाठी आरक्षित होती. संजय ग्रेन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पंजाब सरकारचे कंत्राटदार असलेले दीपक मित्तल, बुधवारी मार्कफेड अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी मंगळवारी चंदीगडला आले होते. त्यांना अलीकडेच पीठ आणि डाळींच्या पॅकेजिंगचे आणि रेशन किट पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते.
क्राईस्टचर्च येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळण्याची ...
प्राथमिक तपासानुसार, बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक वेटर खोलीत गेला असता त्याला मित्तल हे बेशुद्ध पडलेले आढळले. वेटरने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने हॉटेल व्यवस्थापनाला माहिती दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी मित्तल यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. प्राथमिक तपासादरम्यान, पोलिसांना खोलीत दारूच्या बाटल्या आणि काही औषधे आढळल्याचे वृत्त आहे. अतिमद्यपान किंवा दारू आणि औषधांच्या एकत्रित परिणामामुळे त्यांचा मृत्यू झाला का, या सर्व शक्यता तपास अधिकारी तपासत आहेत. तथापि मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई: महाराष्ट्रात सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनींच्या हिस्से विक्रीवरून सहहिस्सेदारांमध्ये निर्माण होणारे वाद आणि वाढत्या न्यायालयीन याचिकांवर ...
मित्तल यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रात्री मित्तल यांच्यासोबत हॉटेलमध्ये गेलेली आणि सकाळी तिथून निघून गेलेल्या महिलेचीही चौकशी तपास अधिकारी करत आहेत. त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा क्रम जाणून घेण्याचा आणि त्यांच्यात आजारपणाची कोणती लक्षणे दिसत होती का, हे तपासण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मित्तल यांना त्यांच्या ड्रायव्हरने हॉटेलमध्ये सोडले होते, असे पोलिसांनी सांगितले. तपास अधिकारी हॉटेलच्या अभ्यागतांच्या नोंदी आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत.