भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ग्रेग चॅपेल यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळावर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला आहे. 2005 ते 2007 दरम्यानचा हा काळ भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट आणि काळा काळ असल्याचे सांगत, चॅपेल यांनी संघात 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण राबवल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे.
'फोडा आणि राज्य करा'चे धोरण
प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना हरभजन सिंगने चॅपेल यांच्या कार्यकाळातील ड्रेसिंग रूममधील कटू आठवणींना उजाळा दिला. चॅपेल यांनी सौरव गांगुली यांच्याशी केलेल्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती हा व्यवस्थापनाचा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले. चॅपेल यांनी खेळाडूंमध्ये आपापसात आपापसात भांडणे लावली, ज्यामुळे एकेकाळी एकसंध असलेला संघ पूर्णपणे विस्कळीत झाला. 2003 विश्वचषकानंतर खेळाडूंमध्ये असलेले घट्ट नाते संपले आणि खेळाडू एकमेकांशी बोलणेही टाळू लागले.
क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात एक अतिशय रंजक आणि हसण्यावारी नेण्यासारखा प्रसंग घडला. भारतीय अष्टपैलू ...
ऑस्ट्रेलियाचा फायदा व्हावा म्हणून रचला कट?
हरभजनच्या मते, त्या काळातील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देत होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन वंशाच्या चॅपेल यांनी भारतीय संघाला कमकुवत करण्यासाठी जाणीवपूर्वक ड्रेसिंग रूममध्ये फूट पाडली. खेळाडू एकसंध राहिले नाहीत तर ते मैदानावर कामगिरी करू शकणार नाहीत आणि याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियन संघाला मिळेल, असा हा मोठा डाव असल्याचा संशय त्याने व्यक्त केला.
Harbhajan Singh reveals on Prakhar's podcast Greg Chappell’s shocking conspiracy that destroyed Team India 💀
He revealed how Chappell divided the team and destroyed it's unity, as India was the only team that could have beaten Australia back then.
Bro really played a dirty game.
— Raya (@Raya1ry) October 21, 2026
2007 च्या विश्वचषकातील मानहानीकारक पराभव
या अंतर्गत वाद आणि गटबाजीतून भारतीय संघाची झालेली वाताहत 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्पष्टपणे दिसून आली. 2003 मध्ये उपविजेतेपद पटकावणारा भारतीय संघ 2007 मध्ये पहिल्याच फेरीत म्हणजेच गट फेरीत स्पर्धेतून बाहेर पडला. बांगलादेशविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का मानला जातो, ज्याची पाळेमुळे चॅपेल यांच्या काळात रोवली गेल्याचा आरोप हरभजनने केला आहे.