Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात ! राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला वकिलाचा मृत्यू झालाय. शीतल दीपक नरवले (वय ३०, रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या शीतल यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, शीतल नरवले या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने (एमएच १५ एफएल ९५९०) कामावर जात होत्या. हॉटेल स्नेहींतसमोरील राणेनगर उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली आणि शीतल या रस्त्यावर कोसळल्या.या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



अंबड पोलिसांकडून तपास सुरु


अपघात घडल्यानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाला द्वारका परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.


कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिला वकिलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने राणेनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकच्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला गती ! काळाराम मंदिर-कपालेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी १२ कोटींच्या खर्चाला मंजुरी

Nashik : नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पांतर्गत पंचवटीतील काळाराम मंदिर आणि कपालेश्वर

PM Modi Chinmaya Amrit Mahotsav : 'देशाच्या विकासासाठी एकत्र या'; चिन्मय अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे भाषण

नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण जो 'अमृत महोत्सव' साजरा केला, तो केवळ एक

Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत

हैदराबाद: उड्डाण भरताच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. हैदराबादहून

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मधून ईशान किशन बाहेर, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला मिळणार संधी

क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हलवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून भारतीय

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर ! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला मंजुरी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

Video: फिल्डर झेल पकडत होता, पण टेम्बा बावुमा पाठमोरा उभा राहिला; असं का ते त्यानेच शेवटी सांगितलं...

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 1-1