
मथुरा-वृंदावन धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी मथुरा आणि वृंदावन हा चांगला पर्याय ठरू शकतो. येथे श्रीकृष्ण जन्मभूमी, बांके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर आणि इस्कॉन मंदिराला भेट देता येते. दिवाळीच्या काळात मंदिरांमध्ये आकर्षक सजावट पाहायला मिळते. यमुना नदीच्या किनाऱ्यावर होणारी आरती आणि परिसरातील भक्तिमय वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. कमी बजेटमध्ये कुटुंबीयांसोबत धार्मिक सहल करण्यासाठी या ठिकाणाचा विचार करता येईल.
2/5
आग्रा – ताजमहाल ऐतिहासिक वास्तू आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहायची असतील, तर आग्रा हा एक पर्याय आहे. जगप्रसिद्ध ताजमहालसोबतच आग्रा किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंनाही भेट देता येते. दिल्लीहून रेल्वे किंवा बसने आग्र्याला जाता येत असल्याने प्रवासाचे नियोजन आपल्या बजेटनुसार करता येते. वेळ कमी असल्यास एक दिवसाची सहलही आखता येऊ शकते. मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरू शकते.
3/5
ऋषिकेश निसर्ग, डोंगर आणि गंगा नदीचा अनुभव घ्यायचा असल्यास उत्तराखंडमधील ऋषिकेशला भेट देता येईल. येथे गंगेच्या किनाऱ्यावर वेळ घालवता येतो, मंदिरांना भेट देता येते आणि गंगा आरतीचा अनुभव घेता येतो. साहसी उपक्रमांची आवड असणाऱ्यांसाठी रिव्हर राफ्टिंगसारखे पर्यायही उपलब्ध असतात. मात्र, अशा उपक्रमांसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागू शकते. कमी खर्चात सहल करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि साध्या निवासाची निवड करता येईल.
4/5
लेण्याद्रीची गुफा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही गुफा आहे. लेण्याद्री गुफा भगवान गणेशाला समर्पित आहे. लेण्याद्रीची गुफा गणेश पर्वताची गुफा म्हणूनही ओळखली जाते. लेण्याद्रीचे अष्टविनायकांमध्ये सहावे स्थान आहे. या गुफेची वास्तुकला इतकी सुंदर आहे की तुम्ही तासन् तास बसून ही वास्तूकला पाहू शकता. या ठिकाणी भक्तांची रोज गर्दी असते. ही जागा पुणे जिल्ह्याच्या जुन्नारपासून सुमारे 4.8 किलोमीटर उत्तरेस आहे. पुण्याच्या सर्वात सुंदर डोंगरांमध्ये लेण्याद्री गुफा आहे.
5/5
बदामी - बदामी हे उत्तर कर्नाटकात असून अप्रतिम वास्तूकला येथे पहायला मिळते. बदामीमध्ये पाहण्यासाठी खूप सारे प्राचीन मंदिर, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. रॉक-कट गुफा मंदिरांसाठी बदामी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर पर्यटन करायचे असेल तर बदामीला एकदा तरी नक्की भेट द्या. बदामी हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.
बदामी - बदामी हे उत्तर कर्नाटकात असून अप्रतिम वास्तूकला येथे पहायला मिळते. बदामीमध्ये पाहण्यासाठी खूप सारे प्राचीन मंदिर, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. रॉक-कट गुफा मंदिरांसाठी बदामी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर पर्यटन करायचे असेल तर बदामीला एकदा तरी नक्की भेट द्या. बदामी हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.





