Ashvini Mahangade: अश्विनी महांगडेच्या आयुष्याची नवी सुरुवात! लग्नाचे फोटो चर्चेत
आता आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे हिने तिच्या चाहत्यांना एक गोड भेट दिली लग्नाचे फोटो आले समोर
October 25, 2026 01:41 PM
1/5 मराठी मनोरंजनविश्वात लग्न सराईची लगबग चालू झाली आहे. त्यातच आता आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे हिने तिच्या चाहत्यांना एक गोड भेट दिली आहे. तिने तीच लग्नाचे फोटो सोशियल मीडिया वर सहारे केले आहेत. तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मधून प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या राणूबाई या भूमिकेमूळे तीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिच्या साधेपणामुळे आणि निर्मळ बोलण्यामुळे तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले.
2/5 सध्या तिने पोस्टमध्ये थेट आपल्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. अश्विनीने अभिनेता आणि कुस्तीपटू भूषण शिवतारेसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. तिने लग्नाच्या फोटोंच्या पोस्टमध्ये पती भूषण शिवतारेला टॅग केलीय. अश्विनीने पोस्ट करताच चाहत्यांकडून तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. तसेच, अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
3/5 त्यांचा लग्नातला लुक सुद्धा खुप व्हायरल होता आहे. तिचा मराठमोळा अंदाजातला साज खूप खुलून दिसत आहे. तर तिचा नवरा भूषण शिवतारे सुद्धा वराचा पोशाखात अगदी रुबाबदार दिसत आहे.
4/5 अश्विनीने केसरी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिचा हातात चुडा, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या, गळ्यात मराठमोळे दागिने असा नववधूचा लूक अगदी खुलून दिसत आहे. तर, भूषणने पांढऱ्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. दोघांचाही शाही लूक अगदी एकमेकांना साजेसा दिसतोय.
5/5 आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करताना अश्विनीनं एक कॅप्शनही लिहिलंय. अश्विनीनं लिहिलंय की, "विवाहाचं सर्वात प्रभावी प्रतीक म्हणजे, दोन व्यक्तींनी एकत्र उभं राहणं नव्हे, तर दोन स्वतंत्र अस्तित्वांनी एकरूप होणं, हे आहे..." याबरोबरच, अश्विनी महांगडेनं पती भूषण शिवतारेलादेखील फोटोंमध्ये टॅग केलं आहे.