Sunday, October 25, 2026

New Railway Rule: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार! २७ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

जेव्हा स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा विषय येतो, तेव्हा भारतीय रेल्वे अग्रस्थानी असते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. जर तुमचाही या या यादीत समावेश असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी. वास्तविक पाहता, 27 ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगचा एक नियम बदलणार आहे, जो तुमच्या रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भारतीय रेल्वे एक मोठा बदल लागू करत आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकावरील काउंटरवर तिकीट बुक करताना रेल्वे प्रवाशांना आता विमा संरक्षणाचा लाभही मिळेल. भारतीय रेल्वेच्या नियमातील बदलाविषयी सविस्तर सांगायचे झाल्यास, रेल्वे 27 ऑक्टोबरपासून काउंटरवरील रेल्वे तिकिटांवर विमा देणार आहे. आतापर्यंत, प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपवरून रेल्वे तिकीट बुक करताना रेल्वे प्रवास विमा निवडण्याचा पर्याय होता. पण आता ही सुविधा थेट रेल्वे काउंटरवरून तिकीट बुक करतानाही दिली जाईल.

रेल्वेचे नियम बदलण्याचा आणि नवीन नियम लागू करण्याचा हा निर्णय वास्तविक पाहता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे आणि जून 2023 मध्ये ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हा बदल केला जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, 06 ऑक्टोबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने रेल्वेला तसे करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने म्हटले होते की, रेल्वे स्थानकांवरील आरक्षण काउंटरवरून बुक केलेल्या सर्व तिकिटांवर विमा संरक्षण लागू केले पाहिजे.

रेल्वे प्रवाशांना किती विमा संरक्षण मिळेल?

ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंगसाठी असलेल्या सध्याच्या ऐच्छिक रेल्वे प्रवास विमा योजनेअंतर्गत, पॉलिसीच्या अटींच्या अधीन राहून मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास प्रवाशांना रुपये 10 लाखांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते. ऑनलाइन विम्याचा हप्ता करांसहित प्रति प्रवासी 45 पैसे आहे. तथापि, काउंटरवरून तिकीट काढण्यासाठी लागू होणारा हप्ता, आवश्यक कागदपत्रे आणि दावा प्रक्रिया यांबद्दल अद्याप पूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >