Ashvini Mahangade: अश्विनी महांगडेच्या आयुष्याची नवी सुरुवात! लग्नाचे फोटो चर्चेत

आता आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे हिने तिच्या चाहत्यांना एक गोड भेट दिली लग्नाचे फोटो आले समोर

1/5 मराठी मनोरंजनविश्वात लग्न सराईची लगबग चालू झाली आहे. त्यातच आता आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे हिने तिच्या चाहत्यांना एक गोड भेट दिली आहे. तिने तीच लग्नाचे फोटो सोशियल मीडिया वर सहारे केले आहेत. तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मधून प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या राणूबाई या भूमिकेमूळे तीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिच्या साधेपणामुळे आणि निर्मळ बोलण्यामुळे तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले.

2/5 सध्या तिने पोस्टमध्ये थेट आपल्या लग्नाचे फोटो शेअर केलेत. अश्विनीने अभिनेता आणि कुस्तीपटू भूषण शिवतारेसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. तिने लग्नाच्या फोटोंच्या पोस्टमध्ये पती भूषण शिवतारेला टॅग केलीय. अश्विनीने पोस्ट करताच चाहत्यांकडून तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. तसेच, अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

3/5 त्यांचा लग्नातला लुक सुद्धा खुप व्हायरल होता आहे. तिचा मराठमोळा अंदाजातला साज खूप खुलून दिसत आहे. तर तिचा नवरा भूषण शिवतारे सुद्धा वराचा पोशाखात अगदी रुबाबदार दिसत आहे.

4/5 अश्विनीने केसरी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिचा हातात चुडा, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या, गळ्यात मराठमोळे दागिने असा नववधूचा लूक अगदी खुलून दिसत आहे. तर, भूषणने पांढऱ्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. दोघांचाही शाही लूक अगदी एकमेकांना साजेसा दिसतोय.

5/5 आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करताना अश्विनीनं एक कॅप्शनही लिहिलंय. अश्विनीनं लिहिलंय की, "विवाहाचं सर्वात प्रभावी प्रतीक म्हणजे, दोन व्यक्तींनी एकत्र उभं राहणं नव्हे, तर दोन स्वतंत्र अस्तित्वांनी एकरूप होणं, हे आहे..." याबरोबरच, अश्विनी महांगडेनं पती भूषण शिवतारेलादेखील फोटोंमध्ये टॅग केलं आहे.
Comments
Add Comment

CBFC Data Leak : CBFC डेटा लीक प्रकरण; 500 हून अधिक चित्रपटांशी संबंधित कागदपत्रे उघड, पटकथा आणि करारांचाही समावेश

Entertainment News: चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची कथा आणि पटकथा गोपनीय ठेवली जाते. मात्र, केंद्रीय चित्रपट प्रमाणन

मुंबईत शिल्पा रावचा शो अचानक बंद; गायिकेची सोशल मीडियावर नाराजी

२४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कलाकारांनी आपली

Attack on Tiger Shroff: टायगरची 'ती' एक चूक महागात पडली आणि....

मुंबईतील जुहू येथील मैदानावरून फुटबॉल खेळून परतत असताना अभिनेता टाईगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर झालेल्या

ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट

मुंबई: सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘फाइल

Namdev Dhasal Biopic: कवी नामदेव ढसाळ यांचा बायोपिक रूपेरी पडद्यावर येतोय, मुख्य भूमिकेत कोण?

दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा काही

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.