Sunday, October 25, 2026

Magzine Movie: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट, अभिनेत्याची आठवण करून देणाऱ्या 'मॅगझिन' मध्ये काय आहे खास?

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या 'मॅगझिन' या चित्रपटाबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी. चित्रपटाची कथा, कलाकार आणि त्यातील अतुल परचुरे यांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

एखाद घर आणि चांगल्या सुख सोयी असतील तर दुसर कायच हवं असत ना माणसाला.. पण या सगळ्यात मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही. कधी कधी आयुष्यात सगळं असून सुद्धा काही तरी हरवल्यासारखं वाटतं. नेमकं काय हवंय, हेच कळत नाही आणि माणूस याचाच विचार करत राहतो. 'मॅगझिन' हा मराठी चित्रपट अशाच एका तरुणाच्या शोधप्रवासाची गोष्ट सांगतो.(MAGZINE) चित्रपटाची गोष्ट वेलू नावाच्या एका सुखवस्तू आणि काहीशा गोंधळलेल्या शहरात राहणाऱ्या Gen Z तरुणाभोवती फिरते. वेलूला असं वाटत असतं की त्याच्या आयुष्यात कोणताही मोठा संघर्ष किंवा रस उरलेला नाही. त्यामुळे तो आपल्या वडिलांच्या मॅगझिन प्रकाशनाच्या व्यवसायातून बाहेर पडतो आणि प्रेरणेच्या शोधात महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी जातो. गावी गेल्यानंतर त्याची भेट त्याचे बालपणीचे मित्र श्रीपाद आणि पुष्पक यांच्याशी होते. या तिघांचे विचार आणि जीवनपद्धती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. या मित्रांच्या सहवासात आणि गावाकडच्या वातावरणात वेलूला आयुष्याचा एक नवा अर्थ कसा सापडतो, हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.
काही वेळा आपल्याला आयुष्य समजून घेण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोच असं नाही. आपल्या नेहमीच्या जगातून बाहेर पडणं, दुसऱ्या माणसांमध्ये मिसळून जाणे आणि त्यांच्या अनुभवांना समजून घेणे एवढंही पुरेसं ठरतं. 'मॅगझिन'चा नायक वेलू अशाच एका शोधप्रवासाला निघाला आहे.(ATUL PARCHURE) 'मॅगझिन' पाहताना सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे सीन्स म्हणजे चित्रपटात अनेक सीन्स असे आहेत जिथे संवाद नाहीत. तरीही त्या प्रसंगांमध्ये काय घडले, पात्रांच्या मनात काय सुरू आहे, हे समजून घेता येते. कलाकारांचे हावभाव, सीन्सची रचना आणि आजूबाजूचं वातावरण बरंच काही सांगून जातं. सुंदर फ्रेम, नैसर्गिक आवाज आणि पत्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना यामुळे या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या चित्रपट थोडा संथ गतीचा असल्यामुळे ज्यांना खूप वेगवान कथा, सतत घडणाऱ्या घटना आणि भरपूर संवादांची सवय आहे अशांना हा चित्रपट कदाचित आवडणार नाही.
23 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज झालेला 'मॅगझिन' हा चित्रपट अतुल परचुरे यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत भावूक करणारा ठरला आहे. त्यांनी आजवर नाटकांमधून, हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून, मालिकांमध्यू लोकांना हसवण्याचा आणि त्या पात्रांचा माध्यमातून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न नेहमी केला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी अत्यंत जिद्दीने झुंज देऊन त्यांनी पुन्हा पुनरागमन केले होते. जरी ते आज आपल्यात नसले, तरी 'मॅगझिन' चित्रपटाच्या रूपाने आणि त्यांच्या इतर सर्व सदाबहार भूमिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या आठवणीत सदैव जिवंत राहतील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >