Tiger Shroff: रस्त्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा निर्णय, अभिनेत्याने मुंबईतील आलिशान घरच विकले

Tiger Shroff Sale Home: गेल्या आठवड्यात जुहूमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने आता त्याचं खार वेस्ट परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील अपार्टमेंट विकल्याची माहिती आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्यावर 18 ऑक्टोबरला जुहू परिसरामध्ये रात्रीच्या वेळी दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. हल्ल्यामध्ये अभिनेता थोडक्यात बचावला. सध्या अभिनेत्याची तब्येत व्यवस्थित आहे. टायगरवर गोळीबाराची घटना झाल्यानंतर अभिनेत्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टायगरने त्याचे जुहूतील अपार्टमेंट विकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचं जुहूतील अलिशान अपार्टमेंट विकलं आहे. अभिनेत्याच्या घर विकण्याच्या ह्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, टायगरचं खार वेस्टमध्ये असलेल्या उच्चभ्रू सोसायटीतील अपार्टमेंट 9 कोटींना विकल्याची माहिती आहे. अभिनेत्याच्या उच्चभ्रू सोसायटीतल्या घराची विक्री 22 ऑक्टोबर 2026 रोजी रजिस्टर झाल्याची माहिती रियल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म CRE Matrix ने दिलेली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रुस्तोमजी पॅरामाऊंट डी कॉ. ऑप. सोसायटीतील 9व्या मजल्यावर अभिनेत्याचं घर होतं. 1,291.14 चौरस फूट कार्पेट एरिया असलेलं घर टायगरने 9 कोटींना विकले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामुळे त्याने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.



मिडिया रिपोर्टनुसार, 2018 साली रुस्तोमजी पॅरामाऊंट डी सोसायटीमध्ये असलेलं घर टायगरने हे अपार्टमेंट बिल्डरकडून 7.61 कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. तब्बल 8 वर्षांनंतर आता अभिनेत्याने तेच त्याचं अपार्टमेंट 9 कोटींना विकल्याची माहिती आहे. खरेदीच्या किमतीच्या तुलनेत टाटगरला विक्रीच्या किंमतीमध्ये सुमारे 1.39 कोटी रूपयांचा नफा झाला आहे. यापूर्वीही टायगरने त्याचे घर विकली आहेत. त्यामध्ये, 2025 मध्ये टायगरने त्याच इमारतीतील दुसरं अपार्टमेंट 15.6 कोटी रूपयांना विकलं होतं. तर 2026 च्या सुरूवातीला पुण्यातील हडपसर परिसरातील मालमत्तेची 8.87 कोटी रूपयांना विक्री केली होती. परंतू अभिनेत्याने त्याचं खार वेस्टमधील घर सुरक्षेच्या कारणास्तव विकल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रीची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे

Comments
Add Comment

Shilpa Rao: बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये शिल्पा राव यांच्या अपमानाचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने व्यक्त केला निषेध

शनिवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईच्या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गायिका शिल्पा राव आपला कार्यक्रम पूर्ण करू शकली

Magzine Movie: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट, अभिनेत्याची आठवण करून देणाऱ्या 'मॅगझिन' मध्ये काय आहे खास?

एखाद घर आणि चांगल्या सुख सोयी असतील तर दुसर कायच हवं असत ना माणसाला.. पण या सगळ्यात मनाला पडणाऱ्या प्रश्नांची

CBFC Data Leak : CBFC डेटा लीक प्रकरण; 500 हून अधिक चित्रपटांशी संबंधित कागदपत्रे उघड, पटकथा आणि करारांचाही समावेश

Entertainment News: चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची कथा आणि पटकथा गोपनीय ठेवली जाते. मात्र, केंद्रीय चित्रपट प्रमाणन

Ashvini Mahangade: अश्विनी महांगडेच्या आयुष्याची नवी सुरुवात! लग्नाचे फोटो चर्चेत

[caption id="attachment_1069003" align="alignnone" width="850"] मराठी मनोरंजनविश्वात लग्न सराईची लगबग चालू झाली आहे. त्यातच आता आई कुठे काय करते फेम

मुंबईत शिल्पा रावचा शो अचानक बंद; गायिकेची सोशल मीडियावर नाराजी

२४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कलाकारांनी आपली

Attack on Tiger Shroff: टायगरची 'ती' एक चूक महागात पडली आणि....

मुंबईतील जुहू येथील मैदानावरून फुटबॉल खेळून परतत असताना अभिनेता टाईगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर झालेल्या