मुंबई: बॉलिवूडमधील हिरो नंबर 1 म्हणून फेमस असलेला अभिनेता गोविंदा अहुजा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजाने गोविंदावर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आरोप केले आहेत. अभिनेत्याचं नाव कोमल राणी स्वर्णकार नावाच्या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. गोविंदा आणि कोमल सध्या 'रूपा' चित्रपटामध्ये एकत्र काम करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गोविंदाने 'एबीपी न्यूज'सोबत संवाद साधला आहे. यावेळी अभिनेत्याने पत्नी सुनीता अहुजासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. मुलाखतीमध्ये अभिनेत्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेल्या वादळावर आणि घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या रामायण चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. चित्रपटातील कलाकारांनी नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या ...
मुलाखतीच्या माध्यमातून, विवाह बाह्य संबंधांचे आरोप, सुनीता अहुजाचा वेगळं राहण्याचा निर्णय आणि घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाने मौन सोडलं आहे. गोविंदाने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "सुनीता सध्याच्या घडीला जे काही करतेय, ते त्यांच्या मुलांच्या भल्यासाठीच करते. माझं 'पहिलं प्रेम' म्हणजे सुनीतासोबत खेळणं चुकीचं आहे. माझ्या प्रेमासारख्या गोष्टीसोबत खेळणं योग्य नाही. माझ्या आणि सुनीताच्या संसारामध्ये फूट पडण्यामागे तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे." मुलाखतीमध्ये अभिनेत्याने नाव न घेता टीका केली आहे. मुलाखतीमध्ये गोविंदाने अनेक प्रश्नांना बेधडक उत्तर दिलेले आहे. त्याच्या ह्या मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.
गोविंदाची त्याच्या कुटुंबीयांकडूनच का इतकी बदनामी केली जातेय? या प्रश्नाचं उत्तर देताना गोविंदा म्हणाला, "वेळ केव्हाच समाजाच्या समोर, पडदा काढत नाही. जेणेकरून व्यक्तीला संपूर्ण जगासमोर अपमानित व्हावं लागेल. खरं तर, मी 8 ते 9 वर्षांपूर्वीच कोणालातरी सांगितले होते की, माझ्या आयुष्यामध्ये असं काही तरी घडेल. मी अशा टप्प्यातून जाईन आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांवर होईल. जर कोणी हे लिहिले असेल, तर ते घडणारच आहे. ज्या व्यक्तीने हे लिहिले आहे, ती काही सामान्य व्यक्ती नाही."
शनिवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईच्या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गायिका शिल्पा राव आपला कार्यक्रम पूर्ण करू शकली नाही. कार्यक्रमाच्या मध्यातच तिचा ...
सुनीताच्या डोळ्यावर पडदा पडलाय का? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता म्हणतो, "बदनामी माझ्या हिस्सावरची आहे, बदनामी माझ्या नावावरूनच केली जातेय, त्यातच त्याचा अर्थ दडलाय. कोणी माझ्यावर प्रेम केलं, तर कोणी माझ्या नावाची भविष्यवाणी केली की, मी कोणाला तरी दगा देईल. आता आपण जे पाहतोय, तो अशा लोकांचा विरोध आहे, जे कालांतरानं शक्तिशाली बनलेत." गोविंदाने मुलाखतीत सुनीताला 'भाग्यवान' आणि 'लक्ष्मी' म्हटले आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचायला मदत केल्याबद्दल तिचे आभार सुद्धा मानले.
गोविंदानं असा दावा केलाय की, तिच्या डोळ्यांवर पडदा पडलाय. सुनीताच्या डोळ्यांवर कोणी पडदा टाकलाय? ते नाव अभिनेत्यानं मुलाखतीत घेतलेलं नाही. गोविंदानं ट्रोलिंगवरही भाष्य केलंय. तो म्हणाला, "आजच्या काळात जे लोकं स्वतःच्या पालकांचा आदर करत नाहीत आणि पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरतात, त्यांच्याकडे मी लक्ष का द्यावं? मला असं वाटतंय की, अशा लोकांची दखल घेणं म्हणजे स्वतःचीच बदनामी करून घेण्यासारखं आहे. चिखलात कमळ उमलतं आणि जर मला 'चिखल' समजलं जात असेल. तर चांगली गोष्ट आहे. सोशल मीडियाचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही..."
एखाद घर आणि चांगल्या सुख सोयी असतील तर दुसर कायच हवं असत ना माणसाला.. पण या सगळ्यात मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही. कधी कधी आयुष्यात ...
सुनिता आणि गोविंदा यांच्यात तणाव निर्माण होण्याचं कारण काय? या प्रश्नावर उत्तर देताना गोविंदाने सांगितलं की, "ती काही जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली आहे. जसे की, सामाजिक अपेक्षा, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांशी संबंधित वचनबद्धता. स्त्रियांचं मन अशा बंधनांत सहज अडकू शकतं. ती जे काही करतेय, ते मुलांच्या भल्यासाठीच करतेय. मी नेहमीच स्त्रियांचा सल्ला घेत आलोय, मग तिचा सल्ला का घेणार नाही? ती जे काही करतोय, ते योग्यच आहे. मुलांच्या कल्याणासाठीच ती हे करतेय..." मुलाखती दरम्यान, गोविंदाने सुनीतासोबतच्या घटस्फोटाबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा म्हणाला की, " घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय सुनीताने घेतला आहे आणि तो निर्णय ती घेऊ शकते. का नाही घेऊ शकत ती तो निर्णय ?" जेव्हा गोविंदाला विचारलं गेलं की, "तिनं हा निर्णय भीतीपोटी घेतला की प्रेमापोटी?" तेव्हा गोविंदा म्हणाला की, "नाही, नाही... आम्ही हिंदू आहोत आणि आमच्याकडे 'घटस्फोट'शब्द वापरण्याची परंपरा नाही. व्यवस्थेतील सर्व आवश्यक तरतुदी आधीपासूनच आपल्याकडे आहेत." घटस्फोट न घेण्याबाबत सुनीताला समजावलं का? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्याने सांगितलं की, "मी जसा आहे, तसा आहे. माझा असा विश्वास आहे की, जर तुम्ही स्वतःच्या भूमिकेवर ठाम नसलात, तर तुम्ही स्वतःच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. भविष्यात मला या विषयावर पुन्हा कोणी प्रश्न नको विचारायला, असं मला वाटतं."