Nashik Kumbh Mela : नाशिकच्या गोदातीरावर 501 शंखांचा आवाज घुमला, रामकुंडावर ऐतिहासिक विश्वविक्रम

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज, कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवार (25 ऑक्टोबर) शंखनाद करण्यात आला. सामुहिक शंखनादातून नाशिकच्या रामकुंडावर गोदातिरी ऐतिहासिक विश्वविक्रम रचण्यात आला.

नाशिक: ज्या क्षणाची नाशिककर आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आज आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज, कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवार (25 ऑक्टोबर) शंखनाद करण्यात आला. 501 जणांच्या सामुहिक शंखनादातून नाशिकच्या रामकुंडावर गोदातिरी ऐतिहासिक विश्वविक्रम रचण्यात आला. देवमामलेदार पटांगणाजवळ हा भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोदातीरावर धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं होतं.




501 शंखाच्या गजरात विश्वविक्रम


एकाच वेळी तब्बल 501 जणांनी एकत्र शंखाचा निनाद केल्यामुळे विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले होते. अखेर हे ध्येय कोजागरी पौर्णिमेच्या सायंकाळी पूर्ण झाले आहे. यापूर्वी एकाचवेळी 303 जणांनी विश्वविक्रम केल्याचा विश्वविक्रम होता. आता हाच रेकॉर्ड मोडत एकाच वेळी 501 जणांनी शंखनाद केल्याची नोंद आयोजकांचा मानस होता. अखेर त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाकडून सहभागींची उपस्थिती आणि आवश्यक निकषांची पडताळणी केल्यानंतर 501 शंखाचा निनाद करण्यात आला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंत विजय शंखनाद पथक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.






31 ऑक्टोबरला ध्वजारोहणावेळीही शंखनाद


शंखनादानंतर गोदातिरावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गोदा आरती देखील पार पडली. भाविकांना आणि पर्यटकांना यावेळी, रामकुंडावर सामूहिक शंखनाद आणि गोदा आरतीमुळे गोदातीरावर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाला. दरम्यान, सायंकाळी चार वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी सहभागी शंखवादकांची नोंदणी, उपस्थिती तपासणी आणि पडताळणी सुरू होती. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार विश्वविक्रमाचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळी सुमारे 05.50 वाजेच्या सुमारास सामूहिक शंखनाद पार पडले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याशी या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या क्षणी याच समूहातील 251 शंखवादकांकडून सामूहिक शंखनाद करणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या मंगलारंभावेळी पारंपरिक शंखनादातून धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडणार आहे.




शंखनाद ही भारतीय परंपरेची ओळख


भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधी, उत्सव आणि मंगलकार्यांमध्ये शंखनादाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून प्राचीन परंपरेचा जागर करण्यासोबतच नाशिकच्या सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. 501 जणांनी एकत्रित शंखनाद करणे हा नाशिककरांसाठी विशेष क्षण होता. विश्वविक्रमाचा प्रयत्न करतानाच भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा व्यापक स्तरावर प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ध्वजारोहणाच्या वेळीही शंखनाद होणार असल्याने या परंपरेला सिंहस्थाच्या मंगलारंभाशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela: शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन नाशिकमध्ये; सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत गिरीश महाजनांची मोठी माहिती

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या; मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे शिक्षकांना आवाहन

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे

Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे आदेश

नाशिक: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्री

Nashik Kumbh Mela: सिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्याचे नियोजन

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारे ध्वजारोहण सोहळे

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या गोदातीरावर उद्या घुमणार 501 शंखांचा निनाद, विश्वविक्रमासाठी शंखवादक सज्ज

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या, रविवार (दि. २५ ऑक्टोबर)

Nashik Ozar Airport : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी ! 25 ऑक्टोबरपासून ओझर विमानतळाचे नवे वेळापत्रक, पाहा सर्व फ्लाइट्सच्या वेळा

Nashik Ozar Airport : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी ! नाशिकच्या ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवांचे नवे