
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगानं वाढीमुळे अनेक तंत्रज्ञान व्यावसायिक त्यांच्या करिअरच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या दिवसेंदिवस दुर्मिळ होऊ शकतात या भीतीने, जवळपास १० वर्षांचा अनुभव असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शेती करण्याचा किंवा स्वतःचे अन्न पिकवण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे उघड केल्यानंतर रेडिटवर एक चर्चा सुरु झाली आहे. त्या अभियंत्याच्या मते, AI विकासाच्या गतीशी जुळवून घेणे कठीण झाले आहे, त्यामुळे मानव या तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी किती काळ बरोबरी करू शकेल याबद्दल त्याला अनिश्चितता वाटते. त्याला भीती आहे की, AI प्रणाली अधिक गुंतागुंतीची कामे हाती घेतील तसतसे पुढील पाच ते दहा वर्षांत नोकऱ्या मिळवणे कठीण होऊ शकते.
'आपण एका अत्यंत विचित्र काळातून जात आहोत आणि आपण सर्वजण याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण खरं सांगायचं तर आता आपल्याला ते जमेल की नाही हे मला स्वतःलाही माहित नाही. प्रत्येक गोष्ट मानवी मेंदूच्या आकलन क्षमतेपेक्षा जास्त वेगाने घडत आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी शेती करण्याचा किंवा स्वतःचे अन्न स्वतः पिकवण्याचा विचार करत आहे. मला मनापासून वाटतं की ५-१० वर्षांत खऱ्या नोकऱ्या फारश्या शिल्लक राहणार नाहीत,' असे त्याने रेडिटच्या कम्युनिटीवरील एका पोस्टमध्ये लिहिले.
Nashik : मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बँक खात्यांमधून ७० लाख ८२ हजार ६१६ रुपयांचा कथित अपहार ...
गोष्टी किती झपाट्याने बदलल्या आहेत यावर विचार करताना ते म्हणाले,'गेल्या वर्षभरात AI बद्दलचे त्यांचे विचार लक्षणीयरीत्या बदलले आहेत.' पूर्वी त्यांचा असा विश्वास होता की, जरी AI कोड लिहू शकत असले तरी, सिस्टम डिझाइन करण्यासाठी आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची अजूनही गरज भासेल. मात्र आता त्यांना वाटते की AI या जबाबदाऱ्या अधिकाधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकत आहे. AI साधने अधिक प्रगत होत असताना वेबसाईट्स विकसित करणे, गेम्स तयार करणे आणि सॉफ्टवेअर ॲज-अ-सर्व्हिस सर्व्हिस उत्पादने लाँच करणे यांचे मूल्य पूर्वीसारखेच राहील का, असा प्रश्नदेखील या अभियंत्याने उपस्थित केला.
त्यांच्या या पोस्टमधून रोजगारावर AI च्या होणाऱ्या परिणामांबद्दल तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढणार चिंता दिसून येते. एकेकाळी जय कामांसाठी अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक होता, ती कामे आता या प्रणाली करू शकत असल्यामुळे आपली कौशल्ये आणि करिअर कसे संबंधित राहतील, असा प्रश्न व्यावसायिक अधिकाधिक विचारत आहेत.



