Monday, October 26, 2026

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा बोलणे पडणार महाग!

रेल्वेतून प्रवास करताना मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा मोठ्याने फोनवर गप्पा मारणे तुम्हाला चांगलेच महाग पडू शकते. रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, शांत आणि विनाअडथळा व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोबाइल व इतर ऑडिओ उपकरणांचा संयमाने आणि समंजसपणाने वापर करण्याचे आवाहन केले आहे. काय आहे रेल्वेचे आवाहन? पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या सूचनेनुसार, ट्रेनमध्ये किंवा रेल्वे परिसर (प्लॅटफॉर्म, वेटिंग रूम) येथे प्रवास करताना प्रवाशांनी इतरांच्या शांततेचा विचार करणे गरजेचे आहे.
  1. स्पीकरवर (Speaker Mode) मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ किंवा रील्स पाहणे टाळावे.
  2. संगीताचा आनंद घेण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी अनिवार्यपणे इअरफोन (Earphones) किंवा हेडफोन (Headphones) चा वापर करावा.
  3. फोनवर संवाद साधताना शक्य तितक्या हळू आवाजात बोलावे, जेणेकरून शेजारी बसलेल्या प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही.
prahaar.in/2026/10/26/a-threat-to-jobs-due-to-ai-an-engineer-with-10-years-of-experience-considers-turning-to-farming/ नियम मोडल्यास 1,000 रुपयांचा दंड! अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा प्रवासादरम्यान काही प्रवासी मोबाईलचा स्पीकर ऑन ठेवून गाणी ऐकतात किंवा मोठ्याने गप्पा मारतात. यामुळे इतर प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांच्या प्रवासात अडथळा निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी ऊँची आवाजात गाणी बजावणे किंवा उपद्रव निर्माण करणे हा 'रेल्वे कायदा कलम १४५' (Railway Act Section 145) अंतर्गत दंडनिय अपराध मानला जाईल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ₹1,000/- पर्यंत दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच, रेल्वे कर्मचारी किंवा टीसी (TC/Railway staff) यांनी सूचना दिल्यानंतरही जर एखाद्या प्रवाशाने ऐकले नाही किंवा हाच प्रकार सुरू ठेवला, तर त्याच्यावर पुढील कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना प्रत्येकाने शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान इतरांच्या सोयीचा विचार करणे आणि सहप्रवाशांना कोणताही त्रास न देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना या नियमांचे तंतोतंत पालन करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >