JPM Mahavidyalaya: जीपीएम महाविद्यालयातील आंदोलनाला मोठे यश; शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करणार!

अभाविप मुंबई व जीपीएम विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर संचालकांकडून निवेदन स्वीकारले; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन

1/5 मुंबई, दि. २६ ऑक्टोबर : जीपीएम महाविद्यालयातील गैरव्यवस्थापन, अपुऱ्या पायाभूत सुविधा, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि शैक्षणिक अनियमिततांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई महानगर आणि जीपीएम विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

2/5 आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महाविद्यालयाच्या संचालकांना सादर करण्यात आले. संचालकांनी हे निवेदन स्वीकारून विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

3/5 तसेच, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

4/5 महाविद्यालयातील मूलभूत सुविधांची दुरवस्था, व्यवस्थापनातील त्रुटी आणि शैक्षणिक अनियमिततांमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करून त्यांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आंदोलनानंतर प्रशासनाने निवेदन स्वीकारून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.

5/5 अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले
“मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, महाविद्यालयातील गैरव्यवस्थेला पूर्णविराम मिळावा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी विद्यार्थी परिषद सातत्याने संघर्ष करत राहील. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.
Comments
Add Comment

कॉम्प्युटर प्रिंटलाही लाजवेल असं हस्ताक्षर! नेपाळच्या प्रकृती मल्लाची जगभर चर्चा

आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा

WTC 2027: ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यातील निकाल न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा! भारतावर असा होणार परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ होते.

500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचा महायुतीच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान चालवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, साडे सात तासानंतर सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.30 च्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य

युएईच्या किनाऱ्यावर तेलाचे लोट; सागरी पर्यावरणाला मोठा धोका, अनेक समुद्रकिनारे बंद

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सागरी पर्यावरणाला बसू लागला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE)

प्रेतासोबत 12 तासांचा प्रवास! गीतांजली एक्स्प्रेसमध्ये कँसरग्रस्त यात्रेकरूचा मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार, तक्रार केली पण...

जमशेदपूर: भारतीय रेल्वेचं निर्ढावलेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुंबई सीएसएमटी- हावडा गीतांजली