दुष्काळी मदतीतून लोकप्रतिनिधी, आयकरदाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शेतकरी असलेले लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे आणि शासकीय कर्मचारी यांना या मदतीतून वगळण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. महसूलमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

रायगड, कोल्हापूरमधील आणखी तालुकांचा दुष्काळी यादीत समावेश होणार


मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी ही मदत सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतकरी असलेले लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे आणि शासकीय कर्मचारी यांना या मदतीतून वगळण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. महसूलमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी ही माहिती दिली.



राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने पाच हजार रुपये अग्रीम देण्याचे ठरविले आहे. मात्र, मदतीचे निकष ठरविताना शेतकरी असलेले लोकप्रतिनिधी, आयकरदाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना या लाभातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या प्रवर्गांतील शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत मिळणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आणखी काही तालुक्यांचा समावेश करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. यासंदर्भातील अहवाल येत्या मंगळवारी प्राप्त होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागामार्फतही राबविण्यात येणार असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असे त्यांनी नमूद केले.


धुळे जिल्ह्यातील रावेर येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. महसूल विभागाची जमीन नऊ कोटी रुपयांना एमआयडीसीसाठी देण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



कर्जतच्या पंप स्टोरेज प्रकल्पाचे समर्थन


कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत बोलताना बावनकुळे यांनी हा प्रकल्प राज्याला वीजपुरवठा करणारा आणि विकसित महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रकल्पासाठी झाडे तोडली जात असल्याचे मान्य करतानाच, त्याच्या तुलनेत अनेक पटींनी वृक्षलागवड करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहा पट झाडे लावली, तरी वृक्षतोडीची भरपाई व्यवस्थापित करता येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखे आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासूनच त्याची जागा निश्चित करण्यात आली असून, अशा प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला मदत होईल, असे ते म्हणाले.



राज ठाकरेंनी राजकारण करू नये


मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी कर्जत येथे जाऊन वृक्षतोडीची पाहणी करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी त्यांना राजकारण न करण्याचे आवाहन केले. प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान कसे टाळले जाईल, याची माहिती राज ठाकरे यांना आवश्यक असल्यास सरकारी अधिकारी देण्यास तयार आहेत. झाडे तोडली जात असली, तरी हरित ऊर्जेचे महत्त्वही लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात ३०० कोटी वृक्ष लावण्याचे नियोजन असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी

Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी

Mumbai Nashik highway fire : मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; कापडाच्या गोण्यांमुळे आगीने घेतला उग्र अवतार

मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी

Western Railway: पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; मीरा रोड स्थानकावरील जिना बंद

पश्चिम रेल्वेने मीरा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ला जोडणाऱ्या दुसऱ्या उत्तर पादचारी पुलाचा

Railway Travel Insurance: ऑनलाईननंतर आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवास विम्याची सुविधा, केव्हापासून प्रवाशांना मिळणार लाभ?

मुंबई: अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. रेल्वेवर दरड कोसळण्याची घटना, रेल्वेच्या

Mumbai-Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील जोडमार्गावर 1 नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी; नवीन वाहतूक नियम लागू

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जोडमार्गाच्या वापराबाबत महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी