Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

गरज पडल्यास चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र सुधारित कायदा करणार

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.(PRATAP SARNAIK)


मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया खात्यांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील व्यक्ती किंवा संघटनेशी थेट संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचे वृत्त आहे.


या घटनेच्या अनुषंगाने ॲपआधारित वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांची पडताळणी, त्यांच्या कागदपत्रांची वैधता आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले.




चालकांची पडताळणी आणि नियमभंगावर कठोर कारवाई


रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची पार्श्वभूमी, परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित नियमांचे पालन यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा कायद्याने दखलपात्र ठरणारे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.


केवळ एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा प्रकारच्या वाहतूक सेवांवर नियमित देखरेख ठेवून त्यांना राज्य परिवहन प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी. तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




गरज पडल्यास कायद्यात सुधारणा


ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांचा विस्तार होत असताना या क्षेत्रातील चालकांना लागू असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये आवश्यक तरतुदी अपुऱ्या ठरत असतील, तर चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सुधारित कायदा तयार करण्याच्या पर्यायाचाही गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.


प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेतील शिस्त आणि कायद्याचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून तक्रारींची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी बजावले.


ॲपआधारित वाहतूक सेवांमुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत असल्या, तरी या सेवांमधील चालकांची पडताळणी आणि नियमन अधिक प्रभावी करण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी

दुष्काळी मदतीतून लोकप्रतिनिधी, आयकरदाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रायगड, कोल्हापूरमधील आणखी तालुकांचा दुष्काळी यादीत समावेश होणार

Mumbai Nashik highway fire : मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; कापडाच्या गोण्यांमुळे आगीने घेतला उग्र अवतार

मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी

Western Railway: पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; मीरा रोड स्थानकावरील जिना बंद

पश्चिम रेल्वेने मीरा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ला जोडणाऱ्या दुसऱ्या उत्तर पादचारी पुलाचा

Railway Travel Insurance: ऑनलाईननंतर आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवास विम्याची सुविधा, केव्हापासून प्रवाशांना मिळणार लाभ?

मुंबई: अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. रेल्वेवर दरड कोसळण्याची घटना, रेल्वेच्या

Mumbai-Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील जोडमार्गावर 1 नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी; नवीन वाहतूक नियम लागू

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जोडमार्गाच्या वापराबाबत महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी