National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 14 हजार 787 पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने नोकर भरती जाहीर केली आहे.

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 14 हजार 787 पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. या पदांवर पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक 983.80 कोटी रुपये खर्चालाही शासनाने मंजुरी दिली आहे.(SUPERNUMERARY POSTS)


राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि अन्य विभागांतील समकक्ष नियमित मंजूर पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार वेतनश्रेणी देण्यात येईल. यामध्ये अपेक्षित वेतनासाठी 978.80 कोटी रुपये आणि प्रवास भत्त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.



या कर्मचाऱ्यांचे सध्या मिळणारे मूळ वेतन संरक्षित राहील. त्यांना महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेंतर्गत सध्या देय असलेल्या रजाही अनुज्ञेय असतील. मात्र, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना तसेच सेवानिवृत्ती अथवा कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही.(NATIONAL HEALTH MISSION)


ही अधिसंख्य पदे व्यक्तिसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच ती अस्तित्वात राहतील. कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यास ते व्यपगत होईल आणि त्यावर नव्याने नियुक्ती केली जाणार नाही. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीही अनुज्ञेय राहणार नाही.



शासनाने या पदनिर्मितीला अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, अन्य विभागांतील कोणत्याही योजना किंवा प्रयोजनासाठी याचा पूर्वोदाहरण म्हणून वापर करता येणार नाही.


“राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 14 हजार 787 अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख होण्यास मदत होईल.” असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.(CONTRACTUAL EMPLOYEES)


Comments
Add Comment

Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी

दुष्काळी मदतीतून लोकप्रतिनिधी, आयकरदाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रायगड, कोल्हापूरमधील आणखी तालुकांचा दुष्काळी यादीत समावेश होणार

Mumbai Nashik highway fire : मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; कापडाच्या गोण्यांमुळे आगीने घेतला उग्र अवतार

मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी

Western Railway: पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; मीरा रोड स्थानकावरील जिना बंद

पश्चिम रेल्वेने मीरा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ला जोडणाऱ्या दुसऱ्या उत्तर पादचारी पुलाचा

Railway Travel Insurance: ऑनलाईननंतर आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवास विम्याची सुविधा, केव्हापासून प्रवाशांना मिळणार लाभ?

मुंबई: अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. रेल्वेवर दरड कोसळण्याची घटना, रेल्वेच्या

Mumbai-Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील जोडमार्गावर 1 नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना बंदी; नवीन वाहतूक नियम लागू

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जोडमार्गाच्या वापराबाबत महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी